पान:मराठी रंगभुमी.djvu/76

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
मराठी रंगभूमि.

जाची अशी गोष्ट होती की, रंगभूमीवर येण्यापूर्वी प्रतापरावास आंतूनच 'जी आलों धनिसाब,' असें यांनी उत्तर दिले तरी बाहेर लोक टाळ्या पिटीत असत, यावरून त्यांच्या आवाजाची लोकांवर किती छाप असे हे सहज कळून येईल. रा. सुपेकर हे हल्ली या मंडळीत नसल्यामुळे जुन्या प्रेक्षकांना त्राटिका नाटकाचा प्रयोग ओकाओकाच वाटतो.
 या मंडळीचा दुसरा उत्तम प्रयोग झटला ह्मणजे हॅम्लेट नाटकाचा होय. शेक्सपियरच्या छत्तीस नाटकांत हॅम्लेट नाटक हे श्रेष्ठ असून त्यांत मानवी स्वभावाचे चित्र जितक्या उत्तम रीतीने रेखटलें आहे तितकें दुसरीकडे क्वचितच सांपडेल. या नाटकांत रा. गणपतराव हे हॅम्लेटचे काम करीत असून आपल्या बापाच्या पिशाच्चाच्या दर्शनाने मनांत उद्भवलेली भीति व चुलत्याच्या निंद्य कृत्यांबद्दल त्यास प्रायश्चित्त देण्याचा निश्चय, आपल्या चुलत्याबरोबर आपल्या आईच्या झालेल्या द्वितीय संबंधाबद्दल तिटकारा, सूड कसा घ्यावा याचा विचार, पावलो-पावलीं, मनाची झालेली चंचलता व अस्थिरबुद्धि, खन्या मित्राबद्दल प्रेम, कार्य साधण्याकरितां पांघरलेलें वेड वगैरे प्रसंगांची त्यांची आत्मगत भाषणे व मुद्रेवर दुःख, शोक इ० विकार प्रगट करण्याचे त्यांचे कौशल्य ही अप्रतिम आहेत; व उत्तम नट असला ह्मणजे आपल्या कृतीने प्रेक्षकांच्या मनावर तो किती विलक्षण परिणाम करितो