पान:मराठी रंगभुमी.djvu/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
भाग १ ला.


वर्षांतून एकच नाटक करीत असत, व त्याप्रमाणें पहिल्या पहिल्यानें 'रोमिओ अँड जुलिएट, ' ' मर्चट ऑफू व्हेनिस ' वगैरे शेक्सपियरादि आंग्लकवींच्या नाटकांचेच मराठींत तिनें प्रयोग केले. हे व पुढील प्रयोग उत्तम रीतीनें बसविण्याचे कामीं कै. रा. नारायणराव फाटक यांचें साहाय चांगलें मिळालें. रा. फाटक हे कोल्हापुरास कांहीं दिवस बडे अधिकारी असून अभिनयकलेंत पूर्ण वाकबगार असल्यामुळे त्यांच्या शिक्षणानेंच या कॉलेजांतील कित्येक विद्यार्थी अभिनयाच्या कामांत फार हुषार झाल. या कॉलेजांत आरंभीं भाषांतरात्मक बुक्रिश नाटकांचेच प्रयोग कांहीं वर्षे झाले. पण त्यायोगानें महाराष्ट्र भाषेत स्वतंत्र अशा नव्या नाटकांची कांहीं भर पडत नाहीं ओसें वाटून व आपल्या विद्यार्थ्यांनाही दरवर्षी नवीं नवीं व सरस नाटकें मिळत नाहीत असें पाहून मि० कॅडी यांनीं ' आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरितां जो कोणी चांगलें नाटक लिहील त्यास १५० रुपयांचें बक्षिस देऊं ? अशा अर्थांची जाहिरात इ. स. १८८५ सालीं वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केली, व त्याप्रमाणें बक्षिसाकरितां कांहीं पुस्तकेंही आली. यांत मिरज हायस्कुलांतील संस्कृत भाषेचे शिक्षक रा. खरे यांचें ' गुणेात्कर्ष ' नाटक आलें असून तें कॉलेजच्या मंडळीस पसंत पडलें, व त्याला बक्षिस देण्यांत आलें. याच पुस्तकाबरोबर रा. देवल यांचें