Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३०
मराठी रंगभूमि.

करण्याच्या कामांत त्यांच्याहीवर ताण करावयाची! रंगभूमीवरून आंत जाईपर्यंत यांचे ओरडणे आणि थयथयाट सारखा चाले त्यामुळे प्रेक्षकांच्या कानठाळ्या बसन जात, व भीतीने पोरासोरांची तर पांचावरच धारण बसे. राक्षसांच्या या धागडधिंग्यावरून पौराणिक नाटकास कोणी ' अलाला ' व कोणी ' तागडथोम' * नाटके ह्मणूं लागले. असो; तर याप्रमाणे राक्षसांची कामें जरी सरसकट दांडगेपणाची होत, तरी त्यांत तरवार फिरवितां येण्याची अत्यंत आवश्यकता असल्या- मुळे कित्येक इसम तरवारीचे हात फारच सुरेख करीत असत; व हे हात पाहण्याकरितांच कित्येक युरोपियन लोकही ती नाटके पहाण्यास मुद्दाम जात. सांगलीकर नाटक मंडळींत तात्या नातू, आळतेकर कंपनीत रघु- नाथ गोळे व वासुदेव दाते, पुणेकर मंडळींत रावजी पोवार यांची तरवार फिरविण्याबद्दल फार ख्याती सांगतात.


(मागील पृष्ठावरून चालू.)

की, 'अजून आवाज कमी पडतो.' पुन्हां तो इसम मोठ्यार्ने ओरडला, व पुन्हां मास्तरांनी ' अजून कमीच पडतो' ह्मणून सांगितले. याप्रमाणे त्या इसमानें बेंबीच्या देठापासून ओरडावें व तालीममास्तरांनी 'अजून कमी पडतो' ह्मणून ह्मणावें. असा प्रकार काही वेळ चालून त्या इसमाच्या आवाजाच्या चिंबोळ्या होऊन त्याला जेव्हां बोलतां येईना तेव्हां तालीम परी करून गुरुशिण्यांची ही जोडी घराकडे वळली.
 * ' तागडथोम' हे शब्द राक्षस बाहेर आला ह्मणजे झांज वाजवून सूत्रधार ह्मणत असे.