पान:मराठी रंगभुमी.djvu/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२९
भाग १ ला.

झाले तरी वरील नियमास अपवाद होते असें नाहीं. वेळीं ओवेळीं तेही नुसता हास्यरस उत्पन्न करीत असत.
 राक्षसांचीं सोंगें करणारे इसम बहुतक अक्षरशत्रु असून तीं कामें बहुधा नाटकमंडळीबरोबर जे आचारी पाणके असत त्यांजकडेच येत. हें सोंग उग्र व भयंकर दिसावें ह्मणून तें पुढें लिहिल्याप्रमाणें सजवीत. चेह-यावर तांबडे, काळे, पांढरे वगैरे रंगांचे पट्टे ओढीत; तोंडांत पत्र्याचे व हस्तिदंती मोठमोठे दांत लावीत; बाहूंवर बेगडाच्या भुजा चढवीत; गळ्यांत कांचेच्या मण्यांच्या, पारोसा पिंपळाच्या, उंबराच्या हिरव्या फळांवर बेगड लावलेल्या, आणि भेडफळांच्या माळा घालीत; कमरेभोंवतीं धोत्रे व लुगडीं गुंडाळीत; डोकीवरून रंगविलेल्या वाकाच्या लांब जटा सेोडीत; व हातांत नागवी तरवार देत. असें हें सोंग सजलें ह्यणजे राळाच्या सरबत्तींत आरडाओरड करीत व तरवार खेळत रंगभूमीवर प्रवेश करी. अशा रीतीनें सेवक व अनुयायी यांची धामधूम संपल्यावर खुद्दांची स्वारी मागून यावयाची ने तिनें ओरडण्याच्या * आणि तरवारीच्या फ्रेंका वगैरे


 * राक्षसाचें सोंग घेणा-या इसमास ओरडावयास शिकवीत असत. ही ओरडण्याची तालीम पाहिलेले एक गृहस्थ असें सांग तात कीं, एका इसमास तालीममास्तरानें गांवापासून दूच्या एका माळावर नेऊन तेथें त्याला ' ओरड' ह्मणून दृक्रम केला.

त्यावर तो इसम मोठ्यानें ओरडला. तेव्हां तालीममास्तर ह्मणाले

(पृष्ठ ३० पहा.)