Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३
भाग १ ला.

प्रथमत: सूत्रधरानें पडद्याबाहेर एका बाजूस राहून मंगला चरण करावयाचें. यात ईशस्तवनपर कांहीं पद्ये तालसुरा वर ह्यणावयाचीं. नंतर वनचराचा वेष घेऊन विदूषकाची स्वारी बाहेर यावयाची. त्याचें वेडेवांकडें नांचणें झाल्यावर सूत्रधाराचा व त्याचा विनोदपर संवाद व्हावयाचा. त्यांत उभयतांची मुलाखत व ओळखदेख होऊन नाटक कोणतें करावयाचें हें सूत्रधारानें सांगावयाचें व पात्रांची सिद्धता आणि व्यवस्था ठेवण्याविषयीं त्यास बजवावयाचें. नंतर गजाननमहाराजांचें स्तवन करून पडदा उघडावयाचा. पडदा उघडल्यावर सूत्रधारानें गजानुनमहाराजांस वेदन करून नाटकामध्यें विनें येऊं नयेत अशाविषयीं त्याची प्रार्थना करावयाची; व गजानन महाराजांनी 'आरंभिलेंले कार्य निर्विघ्नपणे सिध्दीस जाईल' असा आशीर्वाद दिल्यावर पडदा पडावयाचा. नंतर ब्रह्मकुमरी सरस्वती इचें स्तवन करून तिला रंगभूमीचे ठायीं पाचारण करावयाचें. तिचें आगमन झाल्यावर पात्रांचेठायीं धीटपणा व वक्तृत्वशक्ति असावी असा वर मागून घेऊन तिचें विसर्जन करावयाचें व नंतर नाटकास प्रारंभ करावयाचा. प्रारंभ करतेवेळीं सूत्रधारानें नाटकांत कोणुता भाग होणार आहे व आरंभींचा प्रसंग कसा आहे, याचं पद्यांतून वर्णन करावयाचें, व नंतर पात्रांनीं येऊन भाषण करावयाचें. आख्यानें सर्व पौराणिक असल्यामुळे बहुतेक सर्व नाटकांतून देवांची एक कचेरी,राक्षसांची एक