पान:मराठी रंगभुमी.djvu/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


११
भाग १ ला

लेली सर्व कविता आर्यावश्लेोकबद्ध असल्यामुळे नाटकाकडे तिचा उपयोग होईना, म्हणून त्यांनीं रसालुा अनुकूल असें पद्ययुक्त आख्यान तयार केलें. नेतर पात्र जमवून व त्यांना नाटकाचें थोडेबहुत शिक्षण देऊन सदर प्रयोग इ. स. १८४३ मध्यें श्री. आप्पासाहेब यांजपुढें करून दाखविला. हा प्रयोग श्रीमंतांस पसंत पडून त्यांनीं भरसभेत रा. भावे यांची वाहवा केली.

भावे यांची नाटकमंडळी.

 विघ्रसंतोषी लोक जेथें तेथें असावयाचेच. त्याप्रमाणें त्यावेळीं सांगलीसही होते. श्री. आप्पासाहेब यांची भाव यांजवर मर्जी असल्यामुळे त्यांचा उत्कर्ष सहन न होऊन कित्येक कुटिल लोकांनीं त्यांची निंदा आरंभली, व भावे यांचे हातून नाटकाचें काम नीट तडीस जाणार नाहीं असेंही त्यांनीं भाकित केलें. पण भावे यांनीं आपल्या कृतीनें हें भाकत खोटें ठरचून अंगीकृत कार्य शेवटास नेलें. इतके झालें तरी ‘ जित्याची खेोड मेल्याशिवाय जात नाहीं ? या म्हणीप्रमाणें या विघ्रसंतोषी व कुटिल लेोकांनीं भावे यांच्या कृत्यांत विघ्र आणण्याचे प्रयत्न चालविलेच होते. त्यांनीं आतां निराळ्याच मागांचें अवलंबन केलें. नटवेष घेणें धर्मबाह्य आहे असें म्हणून भावे यांच्या नाटकांतील मंडळींस दोन तीन वेळ भरपतींतून उठवून त्यांनीं बहिष्कार घालण्याची खटपट केली. पण श्री. आप्पासाहेब यांच्या पदरचे पंडित