पान:मराठी रंगभुमी.djvu/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०
मराठी रंगभूमि.

कडे नौकर असून त्यांना कविता रचणें, गोष्टी लिहिणें, चित्रें करणें या गोष्टींचा पूर्वीपासून नाद असल्यामुळे वरील प्रश्नास त्यांनीं मोठ्या उत्सुकतेनें रुकार दिला. रा. भावे यांनीं श्री. आप्पासाहेब यांस रुकार दिला खरा, पण रुकार देणें जितकें सोपें होतें तितकें काम करणें सोपें नव्हतें. कविता रचणें, आख्यान तयार करणें हें एक त्यांच्या हातचें काम होतें, पण नाटकाकरितां पात्रांची जुळवाजुळव करणें, त्यांतून स्त्रीवेष घेणारीं पात्रें मिळवणें, त्यांना पढविणें वगैरे कामें सहजासहजीं होण्यासारखीं नव्हतीं. त्याबद्दल त्यांना बरीच खटपट करावी लागली. आतां या कामाकडे जात्याच त्यांचा कल असल्यामुळें व त्यांची उत्सुकताही मोठी असल्यामुळें श्री. आप्पासाहेबांसारख्या थोर गृहस्थाच्या प्रोत्साहनानें व आश्रयानें हें काम चाललें असल्यामुळें वाटेंतील अडचणी कमी होऊन रा. भावे यांचा मार्ग बराच सुगम झाला,

पौराणिक नाटकांचा प्रारंभ.

 नाटकें रचण्याच्या उद्योगास लागण्यापूर्वी रा. भावे यांनीं बरेच महाराष्ट्र ग्रंथ वाचले व पौराणिक इतिहास आणि कथाभाग समजून घेतला. प्रथम सीतास्वयंवर हें आख्यान तयार करण्याचें मनांत आणून लोकांकडून जुन्या कविता त्यांनीं मिळविल्या. पण पूर्वीची सांपड-