घोळघोळून व खुलवून ह्मणूं लागले कीं, मौज वाटून हर्षभरानें लोक त्यांस टाळ्यांवर टाळ्या देत असत.
(४)हल्लीं तीं तींच नाटकें पाहून लोक कंटाळतात याचें कारण त्यांत कांहीं नवेपणा नसतो. हा नवेपणा पात्रे गाणारीं असतील तर वेळेस अनुसरून प्रत्येक नाटकाच्या वेळीं पद्ये निरनिराळ्या रागांत ह्मणून आणतील.
(५) नाटकास नवीनपणा उत्पन्न करण्यास नाटकांवर ज्या टीका झालेल्या असतील त्याप्रमाणें दुरुस्ती करून प्रयोग करावे, ह्मणजे त्यायोगानें नाटकास नवी गोडी येऊन अनायासें लोकांस शिक्षणही दिल्यासारखे होईल.*
*ह्ल्ली सुरू असलेल्या नाटकांपैकीं कांहीं नाटकांत दुरुस्ती करण्यासारख्या ब-याच गोष्टी टीकेंत आल्या आहेत. त्यांतील दोन तीन विशेष महत्त्वाच्या असून थोडक्यांत देतां येण्यासारख्या असल्यामुळे त्या येथें देतों:
-
(१) मृच्छकटिक नाटकांत एका प्रवेशांत रदनिकेच्या ठिकाणीं वसंतसेना हळूच येऊन उभी राहिल्यावर चारुदत्ताने रदनिकाच आहे असें समजून आपला शेला आपला मुलगा रोहेसेन निजला आहे त्याच्यावरें घाल असें म्हणून टाकला. पुढें वसंतसेनेच्या अंगावर तो आपण टाकला हें चारुदत्तास कळल्यावर परिजन ह्मणून आपण शेला टाकला हा आपल्या हातून अपराध घडला असें मानून त्यानें तिच्याजवळ माफी मागितली. ‘ या प्रसंगों विदूषकानें तुह्मी दाघे परस्परांस नमस्कार करितां तेव्हां मीही नमस्कार करितां म्हणून अलीकडील ग्राम्य विदूषकासारखी कोटी केली आहे, ती मूळ कवीची नसून क्षेपक असावी