पान:मराठी रंगभुमी.djvu/२३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०२
मराठी रंगभूमि.


 ( ६ ) नाटक़ात संगीतास जितकी सुसंबद्धता ठेवेल तितकी ठेवावी. नाहीतर वाघ आला म्हणून भीतीनें बोबडी वळली म्हणावयाचे आणि इकडे स्पष्टपणें गात असावयाचं; किंवा वार लागून मरतमरतां ताना झोडा वयाच्या. आमच्या पाहण्यांत तर एकां असें आलें आहे कीं, नाटक संगीत म्हणून त्यांत येणारें पत्रही संगीत आले. बरें पत्र संगीत आलें तें आलें; तें वाचीत असतां अडखळण्याचा भाव दाखविण्याच्या उद्देशानें


(२०१ पृष्ठावरून चालू.)

असे दिसतें; व तसें नवून ती मूळची असली तर हा या नाटकांत थोडासा उणेपणा आहे" विविधज्ञानविस्तर, नोव्हेंबर १८९६.
 ( २ ) "वसंतसेना आपल्याकडे येत आहे असें चारुदत्तास सांगण्याकरितां तिचा एक चेठ कंभीलक आपल्याशीं आपल्या गुणांची फुशारकी करीत आला. त्याने थोडा वेळ मैत्रेयाशीं वसंत सेनेच्या बिनोदपर भाषण करून ती पाठोपाठ येत आहें असें त्याला सांगितले. हीन यांच्यामधील भाषणे पात्रांना अनुरूप अशीच हास्येत्यादक आहेत.”. -वि. वि. जानेवारी १८९८.
 ( ३ ) " विक्रमशशिकलेंतल्या प्रकारचा उत्तान रस व सत्यविजयांतल्याप्रमाणे छकडीच्या योग्यतेची मोहक चलीवर वसविलेलीं पदये तरुण विद्यार्थींची मनें भ्रष्ट व विषयलंपट करण्याची साधनेच आहेत असे झटल्यावांचून आमच्याने राहवत नाही." विविधज्ञानाविस्तार, आगष्ट १८९८.
 याखेरीज ' वीरतनय, ’ ' शारदा, ' ‘ सौभाग्यरमा ' यांच्या वरील विविधज्ञानविस्तारांतील टीका, ‘नारायणरावाचा मृत्यु' वरील केरळकोकिळमधील टीका, सरस्वतीमंदिर, डेक्कन कॉलेज कर्टर्ली, विद्याविलस, सयाजीविजय वगैरे पत्रांतून मूकनायक, 'श्री एकनाथ' वैगरे नाटकांवर झालेल्या टीका पहाव्या.