बाबतींत जास्त आढळून येतात. हा जर ख-या सृष्टीचा अनुभव आहे तर कृत्रिम सृष्टींत अथवा नाटकांत तद्वयतिरिक्त कसा अनुभव येईल ? अर्थात् तामसवृत्तीपेक्षां सत्ववृत्ती अंगीं आणण्यास सायास पडतात ह्मणून मूळच्या सत्ववृत्तीचा होतां होईलतों लोप न होऊं देतां नाटकांतील इसमांनीं गुण्यागोविंद्वानें व एकजुटीनें
वागून ती कायम ठेवणें श्रेयस्कर आहे.
( १३) नाटकांतील इसमांचें खासगी वर्तनही शुद्ध असलें पाहिजे. त्याशिवाय प्रयोगाचा परिणाम व्हावा तसा लोकांच्या मनावर होत नाहीं. पुष्कळांना असें प्रतिपादन करतांना आह्मीं पाहिलें आहे कीं, ' नाटकवाल्यांनीं बाहर काय पाहिजे तें केलें किंवा ते कसे पाहिज तसे वागले तर त्याचा नाटकप्रयोगाशीं काय संबंध? प्रयोगाचे वेळीं त्यांनीं आपलें काम करावयाचें तसें केलें ह्यणजे झालें. ' पण हें ह्यणणें चुकीचें आहे. नष्ट हा एक उपदेशक आहे. आतां केव्हां ते प्रत्यक्षपणें रंगभूमीवर उपदेश करीत असेल व केव्हां आपल्या कृतीनें अप्रत्यक्षपणें लोकांना उपदेशाचा धडा देत असेल, पण ती उपदेशक आहे ही गोष्ट खरी आहे. आणि उपदेशक शुद्धाचरणी असल्याशिवाय त्याच्या उपदेशाचा ठसा लोकांच्या मनावर चांगला उमटत नाहीं, हें जसें ख-या व्यवहारांत प्रत्ययास येतें तसंच नाटकप्रयोगाचे वेळींही येतें. समजा, हरिश्चंद्र, राम, धर्म, तारामती, सीता, मेंडोदरी किंवा
पान:मराठी रंगभुमी.djvu/230
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९६
मराठी रंगभूमि.