प्रत्येक प्रकारांत सुधारणा होण्यास योग्य अवसरच मिळाला नाहीं; व त्यामुळे या कलेंत जी सुधारणा झाली ती अपक्क होऊन अखेरीस ती हानिकारकच होते किं काय अशी भीति वाटूं लागली आहे. या गोष्टीचें विवेचन करीत असतां ' विविधज्ञानविस्तारां ' तील एका टीकाकारानें १८९८ च्या एप्रिलच्या अंकांत पुढील मार्मिक विचार प्रगट केले आहेतः- " इंग्लेंडमध्यें नाटकाच्या प्रत्येक अवस्थेस परिणतावस्थेप्रत पोहचण्यास योग्य अवसर सांपडल्यामुळे नाटकाची उत्क्रांति साहजिक तऱ्हेनें घडून आली. आमच्या इकडे आमच्या बालका प्रमाणेंच आमच्या नाटकाची स्थिति झाल्यामुळें प्रत्येक थत्यंतराचें बालपण, तारुण्य, आणि वार्धक्य, चट सारीं तीस वर्षांत आटपलीं. इतक्या झपाट्यानें आणि ह्मणून अपूर्ण अशी वाढ होणें हें कांहींसे अपरिहार्यच होतें. ज्प्रयामाणें कमीजास्त उष्णतेचीं दोन पात्रें जवळ जवळ ठेविलीं असतां कमी उष्णतेचें पात्र दुस-या पात्रांतील उष्णता आतुरतेनें शोषून घेण्याचा प्रयत्न करितें त्याचप्रमाणें इंग्लंडची सुधारणा पाहून हिंदुस्थानही झपाझप तो कित्ता गिरविण्याच्या नादाला लागलें व शेवटीं परिणाम' एक धड ना भाराभर चिंध्या ! ' तात्पर्य, आमच्या नाटकांत अशा प्रकारची सुधारणा व ती इतक्या बेतानें झाली पाहिजे कीं, नाट्यकलेस अपाय न होतां दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होत गेली पाहिजे.
पान:मराठी रंगभुमी.djvu/216
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२
मराठी रंगभूमि.
