पान:मराठी रंगभुमी.djvu/215

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८१
भाग ३ रा.नाट्यकलेची आस्ते आस्ते सुधारणा
झाली पाहिजे.

 अलीकडे संगीत नाटकांचा विशेष प्रघात पडला आहे; व हल्लीं जीं नाटकें होतात तीं सरस नसल्यामुळे व गाणारीं पात्रेही कमी दुर्जाचीं असल्यामुळे लोकाभिरुचीस एक प्रकारचें अपायकारक वळण लागत चाललें आहे. कै० आण्णा किर्लोस्कर, रा० डोंगरे किंवा यवतेश्वरकर यांच्या कंपनीची गोष्ट फारनिराळी होती. त्यांत गाण्याचा अभ्यास केलेलीं पात्रे होतीं व प्रयोगही भारदस्त होत असत. हल्लीं पाटणकरी वळणावर सर्व नाटकें होऊं लागल्यामुळे नाटकांचा भारदस्तपणा नाहींसा होऊन संगीतही हलक्या प्रतीचें झालें आहे. तसेच पूर्वीच्या रागबद्ध पद्यांच्या चाली जाऊन त्या ठिकाणीं पाशीं चालींचीं पद्ये आली; एवढेच नव्हे तर, संगीत सौभद्रासारखीं जुनीं नाटकेंच्या नाटकें सबंध पार्शी चालीवर होऊं लागलीं आहेत ! आमच्या मतें संगीत नाटकाच्या -हासाचीं हीं लक्षणें आहेत, व तीं ताबडतोब बंद केलीं नाहीत तर लवकरच संगीत कलेचा अस्त होईल असें आम्हांस वाटतें.
 आमच्या इकडे मराठी रंगभूमीवर नाटकें करावयास लागून फार दिवस झाले नाहींत; व आरंभीं पौराणिक, नंतर बुकेिश व नंतर संगीत असे नाटकाचे प्रकार एका मागून एक इतक्या झपाट्यानें अस्तित्वांत आले कीं,