कडे क्कचितच; व शृंगार, वीर, करुणा, इ. रसांपैकीं एखाद्या रसाकरितां दुसरीकडे पाहण्याची पाळी येईल असें मुळींच नाहीं. बुकिश नाटकांसारखीं संगतवार रीतीनें पौराणिक नाटकें रचलीं व त्यांचे प्रयोगही बुकिश नाटकांच्या प्रयोगासारखे मेहनत करून बसविले तर आमचीं पौराणिक नाटकें बुकिश नाटकांसही मागें सारतील अशी आमची खात्री आहे. भीष्म, भीम, अर्जुन, परशुराम, राम, अभिमन्यु, मारुती, इत्यादि एकापेक्षा एक वीरांचा पराक्रम ज्यांत वर्णिला आहे; सुभद्रा, राधा, सुत्यभामा, रुक्मिणी, तारामती वगैरे स्त्रियांचा शृंगार व शोक ज्यांत गोंविला आहे; दुर्योधन, दुःशासन, शकुन इ. एकापेक्षां एक कपटपटूंचें कारस्थान आणि दुष्टबुद्धि ज्यांत व्यक्त झाली आहे; नारद, कृष्ण, पेंद्या, वाकडया अशासारख्यांचा विनोद आणि थट्टा जेथें चालली आहे; भरतरामासारख्यांचें बंधुप्रेम जेथें दृष्टोत्पत्तीस येत आहे; हरिश्चंद्रासारख्या राजाच्या सत्वाची जेथें पारख चालली आहे; रामासारख्यास जेथें वनवास भोगावा लागत आहे; पांडवासारख्यांस जेथें अज्ञातवासांत दिवस काढावे लागत आहेत; द्रौपदी, सीता, तारामती, इ. शुद्धबुद्धीच्या स्त्रियांस जेथें छल सोसावा लागत आहे ते प्रसंग शृंगार, वीर, करुणा, हास्य इत्यादि नवरसांचें केवळ आगर होत. या रसांचा पगडा बुकिश नाटकांच्या धर्तीवर पौराणिक नाटकें रचून व त्याप्रमाणें आभिनय करून प्रेक्षकांच्या
पान:मराठी रंगभुमी.djvu/207
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७५
भाग ३ रा.