पान:मराठी रंगभुमी.djvu/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भाग १ ला.

 पुण्यांतील तमाशे पाहून वांई, सातारा वगैरे ठिकाणीं-ही तसे तमाशे होऊं लागले. सांगलीजवळ कौलापूर म्हणून एक लहान गांव आहे तेथील तमाशाची बरीच ख्याती आहे. तेथें कोणी कृष्ण कवि नांवाचे जोशी उपनांवाचे देशस्थ ब्राम्हण होऊन गेले. त्यांनीं पुष्कळ शृंगारपर सरस लावण्या केल्या आहेत. या लावण्या तेथील तमाशांत म्हणत असत. पण या सर्वांवर रामजोशी यांनीं ताण केली. ते स्वतः व्युत्पन्न व मार्मिक असल्यामुळे लावणींत त्यांनीं बहार करून टाकली; व अखेर अखेर वेदांताकडे त्यांचें लक्ष लागल्यामुळे लोकरंजनाबरोबर तमाशांतून सदुपदेश करण्याचेंही आरंभलें.* असो; त्या
——————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————
  * रामजोशी यांच्यासंबंधानें एक आख्यायिका आमचे वाचण्यांत आली आहे. तींत मौजेची माहिती असल्यामुळे आह्मी ती येथें देतों:-' सोलापुरांत रामजोशीबोवांचे घरांसमोर एक धोंडी शुद्दीर नांवाचे गृहस्थ रहात होते. त्यांचे घरी जोशीबोवांचें जाणें येणें व बैठक असे. जोशीबोवांचे वडील व मातोश्री लहानपणींच निवर्तलीं होती; तेव्हा वडीलू बंधूचे पंक्तीस नित्य दोनही वेळ जेवून जोशीबेवांनीं शाहीरचे घरीं रात्रंदिवस बैठक ठेविली होती. शाहीराचे घरीं रोज रात्रीं मंडळी जमून लावण्या ह्मणत असत. त्याबरोबर जोशीबोवांसही लावण्याचा छंद अतिशय लागला; असें होतां होतां जोशीबोवांस स्वतः लावणी करण्याचा नाद लागला. आणि ते नित्य एक नवी लावणी करून शाहीर यांचे घरीं रात्रीं मंडळीमध्यें ह्मणून दाखब्रू लागले. प्रथमत्ः त्यांनीं शृंगारपर लावूण्या करण्यास आरंभ केला; व लावणीचे शेवटी ते आपल्या मित्राचें ह्मणजे धोंडी शाहीरचें नांव घालू(पृष्ठ ६ पहा.)