Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६२
मराठी रंगभूमि.


मुक्याचें सोंग घेऊन शरच्चंद्राच्या चाकरीस राहिला. नंतर रोहिणीची गांठ पडल्यावर सरोजिनीवर आपली प्रीति जडली आहे व तिच्या प्राप्तीस्तवच मी हें मुक्याचें सोंग घेतलें आहे वैगरे हकीकत त्यानें तास सांगितली. रोहिणीनें विक्रांताची व सरोजिनीची एकांतांत गांठ घातली तेव्हां शरचंद्रास व्यसनापासून सोडवाल तर मी तुमच्याशीं लग्र करीन, असा त्याजपाशीं पण केला. विक्रांतानें तें कबूल केलें. पण शेवटीं निराश होऊन त्याला पूर् जाण्याचा प्रसंग आला. शरच्चंद्रावर जे मारेकरी घातले होते ते केयूर नांवाच्या दुस-या एका राजानें शरच्चंद्राचें राज्य अपहार करावें याच हेतूनें घातले होते; व स्वतः केयूरही बहिऱ्याचें सोंग घेऊन शरच्चंद्राच्या दरबारीं राहिला होता. केयूरानें विकंट नांवाच्या शरच्चंद्राच्या नवीन झालेल्या प्रधानास आपल्या कष्टांत सामील करून घेतलें होतें. सरोजिनीची मुक्यावर प्रीति बसली होती, तो मुका विक्रांत आहे हें तीस माहित नव्हतें. पुढें मुका पणांत हरल्यावर प्रीतीमुळे मी पण बाजूस ठेवतें, माझें पाणिग्रहण करा, असें ती त्यास ह्मणूं लागली. पण विक्रांतानें ती गोष्ट कबूल केली नाही. नतर विक्रांत हा स्वतःच विक्रांताचा वकील ह्यणून सरोजिनीची मागणी करण्याकरितां शरचंद्राच्या दरबारीं आला व तेथें सर्व गोष्टी उघडकीस येऊन सरोजिनीचा व त्याचा विवाह झाला.