नयानेंच साध्य होतो. शेक्सपियरच्या बहुतेक नाटकांतविशेषतः शोकरसप्रधान नाटकांत-पात्रांच्या मनोवृत्तींशीं प्रेक्षकांच्या मनोवृत्तींचें तादात्म्य करावें लागतें, व तें पुष्कळ वेळ सारखे ठेवावें लागतें. हा परिणाम संगीताच्या ललकान्यांनीं होणें अशक्य आहे, व ह्यणून शेक्सपियरच्या नाटकांचा हेतु संगीतांत साध्य होणें दुरापास्त आहे. ' विकल्पविमोचन ' नाटकांत आपली स्त्री जारिणी आहे अशाबद्दल चित्रपाल राजास संशय येऊन तदनुरूप त्याच्या चेह-यांत व वर्तनांत फरक पडतो. पण या चेह-यांतील व वर्तनांतील फरकाचा परिणाम कोठपर्यंत कायम राहतो, जोंपर्यंत राजानें संगीत पद्यास प्रारंभ केला नाहीं तोंपर्यत. एकदां कां पद्यास प्रारंभ केला कीं, चेहन्यावरील पूर्वीचे सर्व विकार नाहीसे होतात, व पद्य ह्मणतांना जोर आणावा लागणा-या हातवा-यानें व तानेच्या भरांत वेडेंवांकडें तोंड करण्यानें वर्तनांत आलेली स्तब्धताही नाहींशी होते. ' तारा ' नाटकांतही असाच मोठा रसभंग एके ठिकाणीं होतो. खंडूजी तारेच्या महालांत चोरून आला असतां यःकश्र्वित् पानाच्या आवाजानेंही भीति उत्पन्न होऊन गांगरून जातो तोच खंडूजी आपण होऊन नि:शंकपणें संगीतांत तानावर ताना झोडतो ही शेक्सपियरच्या नाटकाची प्रतिकृति लगावी कीं थट्टा ह्मणावी? तरी बरें कीं, अजून हॅम्लेट, अथेल्लो वैगरे शेक्सपियरचों प्रमुख मानलेलीं नाटकें
पान:मराठी रंगभुमी.djvu/174
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५६
मराठी रंगभूमि.