पान:मराठी रंगभुमी.djvu/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५५
भाग २ रा.


करी धागडधिंगाच भरला आहे. त्यामुळे प्रयोगास रंग चढत नाहीं. वरील कंपन्यांपैकीं ' स्वदेशहितचिंतक ' कंपनी ही संगीत चंद्रसेना नाटक (अहिमहि आख्यान ) करीत असते; व त्यांतील बरींच पदयें जुन्या चालीचीं असून पात्रंही थोडीबहुत शिकलेली असल्यामुळे* तें नाटक अंमळ बरें होई. त्यातील अहचें काम रा० गणपतराव निंबकर हे करीत असून पूर्वीच्या राक्षसाची निवळ आरडाओरड किंवा तडफ न करितां आवेशयुक्त मोठ्या भाषणानें व मुद्रेवर विचार आणि विकार प्रगट करून करीत असतात त्यामुळे तें प्रेक्षणीय होतें.
 वरील कंपन्यांपैकीं ' नाट्यकलाप्रवर्तक ' कंपनीनें शेक्सपियरचीं कांहीं नाटकें संगीतांत बसविलीं आहेत; पण तीं लोकांच्या मनावर परिणाम करण्यासारखीं होत नाहींत. निरनिराळ्या प्रसंगीं प्रेक्षकांचे विवक्षित मनोविकार जागृत करणें हा एक शेक्सपियरच्या नाटकांचा प्रधान हेतू आहे; व तो पात्रांच्या भाषणानें किंवा अभि


 * ही मंडळी संस्कृत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करीत असते; व तो पुणें, सातारा, कोल्हापूर वगैरे ठिकाणच्या लोकांस पसंत पडला आहे. या कंपनींतील रा० लळित यांनीं संस्कृत भाषेचें थोड़ें अध्ययन केलें असून त्यांचा गायनाचा अभ्यासही चांगला झाला आहे. हे या नाटकांत दुष्यंताचें काम करीत असून रा० निंबकर वगैरे मंडळी दुसरी कामें करीत असतात. नाटकवाल्या मंडळीत संस्कृत नाट्क करणारी कंपनी ही पहिलीच असें ह्मणण्यास हरकत नाही.