पान:मराठी रंगभुमी.djvu/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४८
मराठी रंगभूमि.


शूरसेनानें प्रथमत: एकपत्नीत्रताचा बाणा मिरविला होता, पण शालिनीस वरून तो घालवून टाकिला. एवढेच नव्हे तर, उलट आपल्या कृतीचें पुढे त्यानें मंडणही केलें आहे. ही गोष्ट नाटकास कमीपणा आणणारी आहे. यापेक्षां शूरसेन तसाच राहता व शालिनी शूरसेनुाकरितां झुरून झुरून मला असता तर नाटक बर झाल असतें. हा दोष नाटक पूर्वी शोकपर्यवसायी असतां आनंदपर्यवसायी करण्याचा प्रसंग ग्रंथकर्त्यांस सिंग द्रव्यलोभी खरा, पण त्याला थोडक्यांत ताळ्यावर न आणतां आपल्या दुर्गुणाबद्दल त्याला चांगलें प्रायश्चित्त भोगावयास लावून मग ताळ्यावर आणलें असतें तर विशेष चांगलें झालें असतें. या खेरीज बकुल लहान असल्यामुळे त्याच्या तोंडीं न शोभण्यासारखीं घातलेलीं भाषणें, दैवानें घड्णा-या आकस्मिक गोष्टीचा संबंध, कालाची असंबद्धता वैगरे अनेक दोष या नाटकांत आहेत. पण ते दाखविण्याचें हें स्थल नव्हे. या नाटकाच्या प्रयोगाचा ठसा लोकांच्या मनावर कितपत उमटतो हें मुख्यत्वेंकरून येथें सांगितलें पाहिजे. प्रस्तुत नाटकांत मुख्य जो दोष आहे तो पद्यांच्या दुर्बोधत्वाचा आहे. लोकांस सहज अर्थ समजेल अशीं यांत पद्ये नाहींत. मोठ मोठे संस्कृत शब्द व समास यांची यांत रेलचेल आहे. तशीच अनुमासांचीही गर्दी आहे. आतां कित्येक