करणारीं असल्यामुळे प्रयोगास इतका रंग चढे कीं, त्यांत प्रेक्षक देहभान विसरून त्यांच्या चित्तवृत्ति अगदी तटस्थ होऊन जात; व ' मृग बहु धावती , ' ' सघनवनीं मन रंगे, ' ' अति चपलगति, ' इत्यादि शंकराच्या व 'अभिमान मला मोठा रतिचा, ' ' शिव शिव सदा वदनेि वद जीवा, ' ' सगुणरूपा सुतपा, ' ' मद करेि वसंत तरु, ' ‘ चैतन्य अवचें भरलें, ' ' समसमान आह्मी प्रेमभरे, ' ‘ वाहिला प्राण मी, ' ‘ सखयानी म्या मोहीला,' इत्यादि पार्वतीच्या पद्यांना 'वन्समोअर' होऊन ती पुनःपुनः म्हटली तरी तृप्ति न होतां तीं आणखी ऐकण्याविषयीं लेोकांची अधिकाधिकच उत्कंठा होई. अरण्यांत शंकर पार्वतीला मोहित झाला असतां व तिचें पाणिग्रहण करण्याविषयीं तो जास्त जास्त उतावीळ झाला असतां 'भवानिला कां सोडुनि आला '-' ती भांडे बहुधीट '-' न लावी हात मला. ' इ. जो त्यांचा प्रश्नोत्तर संवाद झाला आहे तो फारच बहारीचा आहे. तसाच त्यांतील शृंगाही श्रेष्ठ प्रतीचा असून तो उदात्तरसानें मिश्र असल्यामुळे अखेर अखेर प्रेक्षकांना चांगलाच चटका लागून प्रयोगाची पारसमाप्ति होई. असो; संगीत नाट्कांवर प्रकाश पाडून त्या कलेंत जी कांहीं भर टाकली आहे तिर्चे थोडेंबहुत श्रय तरी रा० यवतेश्वरकर यांजकडे आहे ही गोष्ट निर्वेिवाद आहे. यांच्या कंपनींत विशेष लक्ष देण्यासारखी जी एक गोष्ट होती
पान:मराठी रंगभुमी.djvu/142
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२४
मराठी रंगभूमि.