पान:मराठी रंगभुमी.djvu/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना.

मी स्वतः पाहिल्यामुळे त्याचा चांगला उपयोग झाला. खेरीज पौराणिक नाटकांचे मूळ उत्पादक कै. रा. विष्णुपंत भावे, संगीत नाटकाचे प्रवर्तक रा. सोकर बापूजी त्रिलोकेकर,'आर्योद्धारक ' कंपनीतील प्रख्यात नट रा. शंकरराव पाटकर, किर्लोस्कर कंपनीतील रा. मुजुमदार व नाटेकर; तसेंच रा. डोंगरे, लोखंडे वगैरे गृहस्थांकडूनही मला बरीच माहिती मिळाली. ही माहिती ज्याच्या त्याच्या समजाप्रमाणे दिली असून कोठे ती अगदीच थोडी होती व कोठे ती फुगवून सांगितलेली होती. तिचा सारासारदृष्टीने विचार करून व प्रसिद्ध झालेल्या कित्येक गोष्टींशी पडताळा पाहून त्यासंबंधानें मला जे लिहावेसे वाटलें तें मी स्पष्ट लिहिले आहे. तसेंच केसरी, इंदुप्रकाश, सुधारक, ज्ञानप्रकाश, नोटिव ओपिनियन, सयाजीविजय, विविधज्ञानविस्तार वगैरे वर्तमानपत्रांतून व मासिक पुस्तकांतून नाटकांच्या पुस्तकांवर अथवा प्रयोगांवर अभिप्राय देतांना ठिकठिकाणी जे विचार प्रगट केले आहेत त्यांतील ग्राह्य वाटले ते मी घेतले आहेत. नाटकमंडळ्यांचा इतिहास देतांना कोठे कोठे त्या जी नाटकें करीत होत्या किंवा करीत आहेत त्यांचा सारांश व त्यांतील विषयांचे थोडेबहुत परीक्षणही दिले आहे. हेतु एवढाच की, सा-मान्य वाचकांससुद्धा नाटकमंडळ्यांच्या इतिहासाबरोबर नाटकांतील विषयही कळावा यांतील माहिती पूर्ण नसून सगळे विचार सर्वांना पसंत पडतील असें नाहीं; तथापि हा विषय नवा असून समग्र लोकांपुढे मांडावा हाच हे पुस्तक लिहिण्याचा माझा हेतु आहे व तो कितपत सिद्धीस गेला आहे याचा विचार करण्याचे काम मी वाचकांवरच सोपवितों. पुस्तकाचे तीन भाग केले असून पहिल्या भागांत मराठी