Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९४
मराठी रंगभूमि.


होत. रा. मुजुमदार हे शकुंतलेचें काम करीत असत. यांना गातां येत नसल्यामुळे आरंभीं शकुंतलेला पद्ये मुळींच ठेविलीं नव्हती. हे देखणे असल्यामुळे यांना स्त्रींवष चांगला शोभे, व इतर पात्रांचें गाण्यामुळे जितकें वजन पडे तितकें यांचें स्वरूप आणि आभनय यांच्यामुळे पड. हे पूर्वी सांगलीकराच्या नाटकांत होते. तें नाटक सोडून कांहीं दिवस झाल्यानंतर आण्णांनीं त्यांस आपले नाटकांत आणलें. दुसरे इसम रा. नाटेकर हे उत्तम गवयी असून रागदारींत खोंचदार पद्ये ह्मणण्याची यांना हृातेटी साधली असल्यामुळे आपल्या बारीक आणि गोड आवाजीनें कण्व, मातली वगैरेंचीं कामें ते फारच बहारीचीं करीत, रा. वाघुलीकर यांचा आवाज दणदकट असून लावणीच्या चालीवरचीं पद्ये ह्मणण्यांत पके मुरले असल्यामुळे, व मुरके घेऊन आपलें गाणें उत्कृष्ट रीतीनें खुलविण्याची यांच्या अंगीं शक्ति असल्यामुळे दुष्यंताचें काम आरंभापासून अखेरपर्यंत फारच उत्तम करीत. आण्णा स्वतः सूत्रधाराचें, शाह्ररवाचें आणि केव्हां केव्हां कण्वाचें काम करीत असत; व त्यांचें गाणें गवयी ढेगार्च नव्हतें व त्यांचा आवाजही विशेष गोड नव्हता, तरी टापटिपणीनें ती तयार केला असून त्यांत एक प्रकारचा भारदस्तपणा असल्यामुळे व त्यांच्या शरिराचा बांधाही धिप्पाड आणि भव्य असल्यामुळे त्यांच्या कामाचें चांगलेंच वजन पडे.
 आण्णांनीं संस्कृत शाकुंतल नाटकाचें गद्यपद्यात्मक