जाऊन तें जसें संपुष्टांत येत चालले आहे तसें अभिनयाचा
भारदस्तपणा जाऊन त्यांतही लघळपणा फार वाढला आहे. म्हणजे
नाटकांतून सरा अभिनय न दिसतां अप्रासंगिक व फाजीलपणाच्या अभिनयाची रेलचेल उडत चालली आहेव गाण्याचें ज्याला कमी अंग आहे त्याला भाषणांत व अभिनयांत फाजीलपणा करण्यांत मोठी प्रोढी वाटत आहेगाणं व अभिनय या दोहोंतही जर यथोचित बहार होऊ लागेल, तर संगत नाटकमंडळीचा
आज जो हंशा उडत आहे तो उडणार नाही असें मला
वाटतें. अभिनय हैं रसोत्पत्तीचें एक प्रमुख साधन आहेव तें
संगीत नाटकमंडळ्यांनींही निर्दोष रीतीनें अंमलांत आणणें
जरूर आहेही सुधारणा अंम्लांत येण्यास हा नाटकांत काम
करणारे अशिक्षित, व अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे निमकच्चे
सुशिक्षित-नाटकांत गेले झणून सुशिक्षित-लोक जाऊन मनुष्य
स्वभावाचें स्वतंत्र परिशीलन करणारे व कवीचे हृदंत समजणारे
लोक नाटकांत आले पाहिजेत. हें केव्हां घडेल तें घडो !
मुंबईच्या सरकारी बुकडेपोचे विद्वान् क्युरेटर रा. रा. गणेश
जनार्दन आगाशे, बी. ए. यांनी मुंबईच्या ग्रंथसंग्रहालयाच्या
पांचव्या वार्षिक समारंभाचे वेळी अध्यक्ष या नात्याने भाषण
केले त्यांत मराठी नाटकांसंबंधाने त्यानीं पुढील मत प्रगट केलें.
" महाराष्ट्र ग्रंथसंपत्तींत संख्येच्या मानाने काव्याच्या खालची
जाग नाटक या सदरास मिळते. १७ वर्षाच्या अवकाशांत
३०६ नाटकें नवीं व्हावी, हें सरुद्दर्शनीं फार अद्धत वाटतें. परंतु
काव्याच्या सदराप्रमाणेच या सदाची स्थित आहेयांत जुन्या
संस्कृत नाटकांची भाषांतरें, तसेंच शेक्सपिअरच्या नाटकांचे
अनुवाद, व कैलासवासी विनायकरावजी कीर्तने व सांप्रतचे
आमचे देवल यांची नाटके खेरीजकरून बाकीचीं बहुतेक
नाटकें केवळ अभिनयार्थच रचल्यासारखीं दिसतात. भाषेच्या