पान:मराठी रंगभुमी.djvu/२९२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५८
मराठी रंगभूमि.


संरक्षणासाठी अशा गोष्टींबद्दल कायद्यांत जे निबंध आहेत त्यांची अंमलबजावणी होणें जरूर आहे. उदात्त व गंभीर कल्पना, उच्च मनोवृत्तींचीं पात्रे वगैरे सरस नाटकाचे जे दुसरे गुण आहेत तेही हल्लीच्या बऱ्याच नाटकत नाहीत. त्यासंबंधाने येथे विशेष विवरण करून जागा अडविण्याचा माझा हेतु नाहीं. सांगावयाचे तात्पर्य म्हणून एवढेंच कीं, हल्लीं संगीत मंडळ्यात नाटकें करीतात त्यांत सरस अशी अगदीच थोड आढळून येतील; व जोपर्यंत यासंबंधानें सुधारणा होणार नाही तोपर्यंत नाट्यकलेची नाटकवा- ल्यांकडून जी दुर्दशा होत आहे तींत आधिकच भर पडत जाईल.
 नटवर्ग-प्रयोगास रंग चढण्यास पात्रेही उत्तम असावी लागतात. गद्यनाटकांतील पात्रांना संगीत पात्रांपेक्षा कांही निराळे गुण लागतात. पण संगीत नाटकांविषयींच मुखत्वें करून मी येथे लिहीत असल्यामळे त्याचे विवेचन करीत नाही. संगीत नाटकांत गायनकलेचें अध्ययन केलेला मनुष्य पाहिजे, व असें असेल तरच त्याची छाप नाटकांत पडेल. हल्लीच्या संगीतास सुरापेक्षां तालाची अत्यंत जरूरी लागू लागली आहे व शास्त्रशुद्ध संभावित गाण्यापेक्षां उसन्या ऐटीनें गाण्याचे ढंग करणार्या इसमांची अवश्यकता भासुं लागली आहे. जुन्या पद्धतीने लावणीच्या चालीवरची पदये म्हणणाराची रीझ नसून “ हे महंगा, ' फिरवि वदन' व 'अजबू चाज है पैका' अशांसारखी धडपडीची व छकडीच्या तालावरील पदये म्हणणारांची वाहवा जास्त होत चालली आहे, व नाटकमंडळ्याही अशाच पात्रांना अधिक उत्तेजन देऊ लागल्या आहेत. पूर्वीचे नाटकांत लावणीचे चालीं वरील पदये किंवा संवाद नव्हते असे नाही; पण त्या वेळचीं पात्रें गाणारी असून त्यांच्यांत भारदस्तपणाही पुष्कळ असल्यामुळे नाटकप्रयोग चांगले होत. गाण्याइतकेंच अभिनयाचेंही अंग पात्रांचे ठायीं असले पाहिजे. संगति नाटकांत अभिनय कशाला पाहिजे, गाणे झालें म्हणजे झालें असें कोणी कोणी प्रतिपादन करीत असतात, पण माझ्या मतें ही चूक आहे गाण्याप्रमाणेंच भारदस्त अभिनयाचीही जरूर आहे. अलीकडे गाणे बिघडत