पान:मराठी रंगभुमी.djvu/२८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५०
मराठी रंगभूमि.


च्याहीसंबंधानें योजण्यास हरकत नाहीं. कोणताही शब्दोच्चार मुखावाटे बाहेर पडण्यापूर्वी त्याचें मनन चित्तांत होतें. त्यानंतर मुद्रेवर किंवा शरीरावर त्या मननाचा अगोदर परिणाम दिसून मग शब्दोच्चार झाला तर होत असतो. विचार, आचार, उच्चार या तिन्ही क्रिया भाषणप्रसंगी एकदम होत असलेल्या दिसत,परंतु सूक्ष्मदृष्ट्या त्यांच्या उगमाचा स्वाभाविक अनुक्रम हाच आहे. यांत विपर्यास बिलकुल होतां अगर दिसतां कामा नये.विपर्यास झाला तर तें स्वभावाच्या विरुद्ध होते व म्हणूनच यांत खरेपणा दिसत नाही. भाषणाशीं अभिनयाचे एकरूप साह्चर्य राहिलें नाहीं आणि आधीं भाषण निघून मागाहून याचा दर्शक अभिनय झाला किंवा भाषण एक असून अभिनय दुसराच चालला असला, तर तो प्रकार अगदीं अस्वाभविक दिसतो. नटामध्यें तो मोठा दोष मानला आहे. पूर्वविचाराखेरीज अभिनय नाहीं आणि अभिनयाखेरीज भाषण नाहीं ही परंपरा नैसर्गिक आहे, कोणत्याही अवस्थेचा यथार्थ अनुकार नटाकडून होतांना तत्संबंधी भाषण या परंपरेनें होत आहे असेंच प्रेक्षकांच्या दृष्टीस आलें पाहिजे. एखादे प्रसंगीं भाषणाशिवाय नुसता अभिनयच असुं शकेल. कारण एके ठिकाणीं म्हटल्याप्रमाणे:-" Action is eloquence and the eyes of the ignorant more learned than the ears. "म्हणजे अभिनय हीही एक स्वतंत्र भाषाच आहे.आणि सामान्य लोकांच्या कानापेक्षां त्यांचे डोळे विशेष तिखट असल्यामुळें ही भाषा तर सर्वांना सहज समजत असते. अभिनयाविषयीं सिसरोनें असेंच म्हटलें आहे. तो लिहितोः-" Action which by its own powers displays the movements of the soul.affects all mankind. : क्रियेच्या ( अभिनयाच्या ) योगाने अंतःकरणांतील सर्व विकार अगदी स्पष्ट होत असतात व यामुळे तिचा परिणाम मनुष्यमात्रावर सहज होत. ‘स्पेक्टेटर' मधील एका नाट्यविषयक निबंधांतसुद्धां असेंच सांगितले आहे कीं, "भाषा