पान:मराठी रंगभुमी.djvu/२८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४९
भाग ३ रा.


अभिनय व भाषणे यांत एकरूपता पाहिजे.

 आभिनय आणि भाषण ह्या जरी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तरी दोहोंचा हेतु-दोहोंचे कार्य-एकच आहे. कांहीं एक शब्दोचार न करतां केवळ शरीरविक्षेपानें आपला मनोभाव इतरांस कळविणे किंवा अंतर्विकार बाहेर दर्शविणं याचे नांव अभिनय. आणि कांहीं विवक्षित रीतीनें शब्दांचे उच्चार करून त्यावरून आपले मनोगत किंवा मनोविकार प्रगट करणे याचे नांव भाषण होय. अभिनय दाखवावयाचे असतात आणि भाषणं ऐकावयाची असतात. नाटकाची गणना दृश्यकाव्यांत आहे. म्हणजे यांत ऐकण्यापेक्षां पाहण्याचेंच महत्व अधिक असतें. म्हणूनच नट म्हटला म्हणजे तो अभिनयकुशल विशेष असावा लागतो. भाषेपेक्षां बिनभाषेचा म्हणजे मूकपणाचा व्यवहार त्याला अधिक स्पष्ट आणि बिनचूक करतां आला पाहिजे. तथापि, भाषणाचेंही महत्व कांहीं कमी नाहीं. नटाचे ठिकाणी दोहोंचें अगत्य अगदीं सारखे असले तरच त्याच्या कौशल्यापा सून सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना सारखा आनंद होईल....विलायतेत बूख नांवाचा एक सुप्रसिद्ध नट होऊन गेला तो अभिनयांत त्याचप्रमाणे भाषणांतही अतिशय कुशल असे. आनंद , दुःख, करुणा, तिरस्कार, राग इत्यादि त्याचे मनोभाव प्रेक्षकांना त्याच्या भाषणाने जसे स्पष्ट ऐकू येत तसेच त्याच्या अभिनयाने ते स्पष्ट दिसतही असत; आणि म्हणूनच त्याच्यानाटक- प्रयोगाला आंधळे आणि बहिरे दोघेही जाऊन एझाला नुसत्या भाषणश्रवणाने आणि दुसन्याला अभिनयदर्शनाने सर्व नाटक प्रयोगाचे यथार्थ स्पष्ट ज्ञान होई.
 नानाविध प्रेक्षकांच्या मनावर नटांच्या कौशल्याचा अशा प्रकारें परिणाम अभिनय व भाषण यांचे त्यांच्या ठिकाणी एक रूप साहचर्य असले तरच होत असतो. जें भाषण तोच अभिनय किंवा जो अभिनय तेंच भाषण असले पाहिजे. " चित्ते वाचि क्रियायांच साधूनामेकरूपता " असें जें सुभाषित आहे तें नटा-