Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३५
भाग ३ रा.


विलें आहे, त्यांचे कारण तरी हेंच. आमच्याकडे करुणापर्यवसायी नाटके लिहिण्याचा शिरस्ता नसल्यामुळं उपनायकावर अधिक कडक शिक्षांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रेक्षकांची इच्छा जागचे जागीं राहण्याचा फार संभव असता. नुसता सद् गुणाचा जय हा त्यांच्या धाधावलेल्या चित्तांना पुरेसा वाटत नाही, म्हणून निदान उपनायकाच्या मूखपणाबद्दल . पोटभर हसण्याची त्यांच वाजवं वासना तृप्त करणे भाग पडते. मृच्छकटिकाच्या सातव्या अंकांत शकार मूर्खपणाची भाषणं बोलत वसंतसेनेच्या पायांवर पडतो, त्यावेळी त्याला जास्ती शिक्षा द्याव असें काठिण हृदय प्रेक्षकांच्याही मनांत येत नाही. वसंतसेनेची क्षमा ही त्यावेळी स्वाभाविक आणि शर्विलकाची विनंति ही निर्घण वाटावयास लागते. राजद्रोहासारख्या भयंकर गुन्हाबद्दल साध्या शिक्षा देण्यामुळे रोमशहूरावर भयंकर प्रसंग ओढवले असे प्रसिद्ध इतिहासकाराच मत आहे. जो नियम एखाद्या संस्थानास, तोच मनुष्याच्या मनासही लागू आहे. दुष्टपणाचें शासन कोणत्या तरी तऱ्हेनें न दिल्यास मनुष्याच्या सदसद्विचारयुद्धला एकदम धक्का बसतो, मनाचे आरोग्य नाहीसं होतं, ईश्वरविषयक बुद्धि डळमळू लागते. आणि या सर्व गोष्टींमागून होणारे भयंकर परिणाम कांही केल्या चुकत नाहीत.

विविधज्ञानविस्तार, आक्टोबर १८१८.

वीरतनयाची ढाल.


अश्लील विचार कितपत घालावेत ?

 अश्लील विचार घालण्यासंबंधाने आमचे असे मत आहे की, नुसती अश्लीलता सर्वथैव निंद्य होय. तीच जर एखाद्या सुंदर विचाराशी अशा रीतीनें संलग्न असली की, ती गाळली असतां तो विच रही आणितां येत नाही तर ती क्षम्य असते. कारण, अशा प्रसंग अलीलतेकडे गौणत्व येऊन प्रेक्षकांचे मन त्या सुंदर विचाराकडे वेधून जाते. तरी पण चुंबन, आलिंगन या पलकडील विचार प्रथित करणे फारच गर्हणीय आहे. कित्ता.