रा० खरे म्हणतात कीं, मृच्छकटिकांतील शकार या पात्रा
वरूनच मी शुंभसेनाचें पात्र बनविले आहे. आतां शकार या
पात्राबद्दल दुसऱ्या कोणत्याही नाटकांतील उपनायक घेतला
तरी त्याच्या अंगीं दुष्टपणा आणि भित्रेपणा या दोन गुणांचें
संमीलन आढळून येईल. याचे कारण उघड आहेज्या मनु
याच्या हातून दुष्ट कृत्ये वारंवार होतात त्याचे मन त्यापासून
होणार्या परिणामाविषयीं भीरु असतें. मिल्टनचा सैतान आणि
शेक्सपियरचा यागो हे एकंदर उपनायकांच्या वर्गास केवळ
अपवादरूप होत. तिसरा रिचर्ड हा दुष्ट लोकांचा मुकुटमणी
आणि क्रौर्याचा पुतळा ना ? पण शेक्सपियरने त्यालाही शेवटी
पक्ष्यात्ताप करावयास लाविलें आहे. तारा नाटकांतला मुरारराव
पह्म; भेकडच. शेक्सपियरच्या दोन तीन नाटकांतील फालस्टाफ हें अत्यंत चातुर्याने रेखलेलें पात्र पहा; भित्रीच. ह्याम्लेट
नाटकांतला राजा पहा, किंवा म्याकबेथ पहा, आपणास नेहमीं
दुष्टपणाबरोबर भित्रेपणा गोविलेला आढळून येईल, इतकेंच
नाही तर असेंही म्हणतां येईल की, भित्रेपण दुष्टपणाशीं निक
टत्वानें संलग्न असलेला दाखविला नाही तरी दुष्टपणाचें भयंकर
चित्र काढणे हा जो नाटकाचा मुख्य हेतु तोही अपूर्ण रिती
नेंच सिद्ध होईल.
प्रेक्षकांस सद्गुण करण्याकरितां ज्याप्रमाणे उपनायकाच्या
ठिकाणी भित्रेपणाची स्थापना करावी लागते, त्याचप्रमाणे
दुर्गुणांचा पाडाव व्हावा अशी जी त्यांची इच्छा ती पूर्ण करण्या
करितां मूर्खपणाची स्थापना करावी लागते. दुर्गुणी मनुष्याचा
अंत झाला तर फारच चांगलें; तसे झाले नाही तर निदान
कारागृहवास तरी तोही नसल्यास त्याच्या मुखपणाचें प्रदर्शन
मिसेस हेन्री वुड या कांदबरीकथंनी ‘ईस्टलिन्' या प्रसिद्ध
कादंबरीत उपनायकास कांही कारण नसतांना चिखलांत लोळ-