पान:मराठी रंगभुमी.djvu/२५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२५
भाग ३ रा.


नातें व रंगाने भूषविलें आहे. सगळ्यांत अतिशय विलक्षण भाग म्हणजे प्रचंड जिना होय. याची लांबी १९७ फूट, रंदी ४३ फूट, उंची ६९ फूट आहे.' अशी विस्तीर्ण व प्रचड नाटकगृह आमच्या इकडे होण्याचा काल अद्यााप आला नाही. तथापि, जीने वगैरे मोठे करून लोकांस ऐसपैस बसण्याची सोय होईल अशीं नाटकगृहें बांधण्यास हरकत नाहीं. असे आम्हांस वाटते. मुंबई, बडोदें, वगैरे दोन तीन शहरांत विस्तीर्ण व सोईची अशी कांहीं नाटकगृहें आहेत. पण इतर शहरांतून त्यांचा अद्याप अभावच आहे
“ नाटकगृहें व त्यांची रचना " या विषयावर शिल्पकलाविज्ञान मासिक पुस्तकाच्या नोव्हेंबर १८८७ च्या अंकांत प्रो. भानू यांनीं विलायतच्या ‘दि एंजिनिअर पत्रांतील लखाच्या आधारें एक निबंध लिहिला आहे. त्यांत नाटकगृहास आग वगैरे लागू नये म्हणून जे उपाय सुचविण्यात आल आहेत ते महत्वाचे आहेत. त्यांतील कित्येक गोष्टी येथे देतों-
 (१) नाटकगृहास जें सामन घालावयाचें तें विवक्षित रसायन पदार्थांत बुडवून मग त्याची योजना करावी.
 (२) होतां होईल तितका लोखंडाचा उपयोग करावा.
 (३) नाटकगृहाला असणान्या ग्यालऱ्या, खिडक्या आण त्यांचे पुढील भाग यांची जमीन लोखंडी करावी.