आमच्या इकडलि नाटकगृहांतही अद्याप पुष्कळ सुधारणा झाली पाहिजे. पुष्कळ नाटकगृहें असुंद असून आंत खेळती हवा चांगली नसते; तसेच थोड्या जागेत पुष्कळ माणसें बसवीत असल्यामुळे कोंडवाडया प्रमाणं छंचाडैची होऊन प्रेक्षक लोकांना अनेक गैरसोयी सोसाव्या लागतात. त्याचप्रमाणे बोर्ड अरुंद असून पात्रांना जाण्यायेण्याची चांगली सोय नसते व देखावेही चांगल्या रीतीने मांडतां येत नाहीततसेच नाटकगृहांत केव्हां केव्हां गर्दीमुळे जाण्यायेण्याचा मार्ग बंद होऊन लोकांची गैरसोय होते. ही गैरसोय जाण्यायेण्याचे निर निराळे रस्ते करून दूर करतां यइल. याखेरीज स्त्रीपुरुषांना समोरासमोर न बसवितां पुरुषांच्या पाठीमागें स्त्रिया किंवा अशाच प्रकारची दुसरी व्यवस्था करून व जाळ्या घालून त्यांना बसण्याची सोय करावी. तृणजे ‘लोकांचें नाटका वरचें लक्ष निघून हातांतल्या दुर्बिणीचा मोर्चा तिकडे फिरविण्याचा त्यांना प्रसंग येणार नाही; किंवा नाटकांतील पात्रेही केव्हां केव्हां चोरदृष्टीने पाहतात तेंही बंद होईल! आी फ्रान्समधील एका नाटकगृहाचे वर्णन एके ठिकाण वाचलें आहे तें असैः –“तें नाटकगृह सगळ्या जगांत मोठे थोरलें आहेत्याने पावणेतीन एकर जमीन व्यापली असून तें बांधण्यास चवदा वर्षें लागली व २,१६,००,० ० ० रुपये त्यावर खर्च झाले. याचें अंतरंग व बहिरंग उत्तम सामा-