पान:मराठी रंगभुमी.djvu/२५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२
मराठी रंगभूमि.


ळ्याचे. ह्या दिवसांत वीररसाचा देखावा बघण्यापेक्षां ज्यापासून मोरांसारख्या प्राण्यांना देखील आनंद होऊन ते थैमान करून सोडतात, अशा मेघांच्या गडगडाटांत मनाला उत्साह देणारा जो श्रृंगाररस तो ज्यांत आहे, असें रविवारी दिवसा होणरें जें मंजुघोषा नाटक तें आपण आपल्या सह्मचारिणसह बघायला जाणार ?
 तुझं म्हणणं खरं आहे; परंतु श्रृंगाररसांत पुष्कळ भेद आहेत. त्यांपैकी सध्यांच्या अतूला शोभणारा असाच रस हा ह्या मंजुघोषा नाटकांत आहे का ?
 यांत काय संशय ! अरे या नाटकांत पर्जन्य काळाला शोभेल असाच मधुर श्रृंगार असून स्फुरण चढविणारा वीररस, विरहानलाची हृदयांत कालवाकालव करणारा शोक आणि दुःखाला पळविणारा हास्य-इतके रस असून शिवाय ज्यांच्या दर्शनानं मनावर उत्कृष्ट परिणाम होऊन पतिपत्नींना आनंदांत गर्क होतां येईल, असें हें नाटक आहे.
 ठीक आहे. पाहूं या तुझे बोलणे कितपत खरं आहे तें. रात्रीं स्वस्थ झाेंप घेऊन रविवारी दिवस ढणारं मंजुघोषा नाटक बघायाला जाऊ या.


 सुखवस्तु गृहस्थ:–पैसे गेल्याबद्दल मनाला आणि जा गरण झाल्याबद्दल डोळ्यांना त्रास होणार नाही, असें कोणतें बरें नाटक आज आपण पहावें ?
 विद्यार्थी:–माझा अभ्यासाचा वेळ मोडला असें न होतां त्यांतल्या त्यांत इतिहासाचे ज्ञान आणि नीतीचीं तवें माझ्या मनावर ठसतील, असें कोणतें बरें नाटक आज आपण पहावें ?
 स्त्री:- बभित्स शृंगारापासून मन उद्विग्न न होतां निर्मळ पातिव्रत्य उज्वल यांची उदात्त कल्पना ज्याच्या योगाने मनावर बिंबेल, असें बरें नाटक आज आपण पहावें?
 चुगलखोर :—लोक मला नांवें ठेवतात इतकंच नव्हे, तर