Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१९
भाग ३ रा.


एकमेकांनी एकमेकांस पात्रांची वगैरे कशी मदत करावी* इ. गोष्टींचा खल होऊन त्यापासून नाटकमंडळींचा चांगला फायदा होईल. या कामास पैशाची गरज लागेल ही गोष्ट खरी आहे; पण आजपयत निरनिराळ्या फडास नाटक मंडळ्यांनी जशी मदत केली आहे तशीच या कान्फर न्सास मदत करून आपल्या स्वतःकारता म्हणून एक मोठा फड उभारावा व त्यांतून नाट्यकलेची सुधारणा करावी. तसेच रा० बव यांच्या प्रयत्नान विजयादशमीच्या सुमुहूर्तावर नाशिक यथ दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘‘ विविधनाट्यविषयसंग्रह नामक संस्थेप्रमाणे ठिकठिकाणी संस्था स्थापून त्यांत नाटकाचा पुस्तक, स्थलांचे देखावे, अभिनयांचे फोटो, रंगाचें सामान वगैरेंचा संग्रह केला तर त्यापासूनही या कलेस उत्तेजन येण्यास मदत होणार आहे.

जाहिराती व हस्तपत्रकांत सुधारणा.

 अमुक दिवशीं अमुक प्रयाग आहे हे लोकांस कळ विण्यास नाटकवाल्यांस जाहिराता व हस्तपत्रक हें एक मोठें साधन आहे. पण या जाहिरातींत व हस्तपत्रकांत


 * पाश्चात्य देशांत नटाचा एक धंदाच होऊन बसल्यामुळें पाहिजे त्यावेळीं पैसे खर्च करून नट आणतां येतात. आमच्याकडे अद्याप तशी स्थिति नसल्यामुळे प्रारंभीं नाटककंपन्यांनी परस्परांस नटांची मदत करण्यास कांही हरकत नाही. मात्र कंपनीकंपनीत परस्परांविषयीं ह्रीं जो मत्सरभाव दृष्टीस पडतो तो नाहींसा होऊन त्यांनी थोडी उदारबुद्धि वागविली पाहिजे.