पान:मराठी रंगभुमी.djvu/२५२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१८
मराठी रंगभूमि.


अलीकडे वर्तमानपत्रांतून पुष्कळ वेळां नाटकांची नुसती स्तुती येत असते, व त्या स्तुतीवरून लोकांची नाटक पहावयास जाण्याची प्रवृत्ति होते; व शेवटीं प्रयोग वाईट झालेला पाहून निराशेने त्यांस परत यावें लागतें. पत्र कर्त्यानीं निदान एवढं तरी करावें की, गुणदोषांचें विवेचन करण्यास त्यांस सवड नसल्यास स्तुति न करतां अमुक दिवशीं अमुक प्रयोग झाला व अमुक दिवीं अमुक होणार आहे एवढंच लिहावें. प्रयोगांतीं कोणी विद्वान् जर ताबडतोब पात्रांच्या आंगचे गुणदोष दाख वील तर नाटकवाल्यांस तो एक प्रकारचा वचक होऊन प्रयोगांत चांगल्या रीतीने सुधारणा होईल. याखेरीज डा० गर्देप्रभृति किर्लोस्कर मंडळीच्या हस्तपात्रिकांवर सह्या वगैरे करून त्यांना जसे प्रोत्साहन देतात तसे चांगल्या कंपनीस चांगल्या विद्वानांनीं हातीं धरून प्रोत्साहन द्यावें. याखेरीज रा० अनंत वामन बर्वे यांनी नाशिकास नुकताच सुरू केल्याप्रमाणें " नाट्यकला परीक्षण के समारंभ ठिकठिकाणी करून उत्तम नट व गायक यांस बक्षिसें द्यावीं म्हणजे त्यायोगानेंही नाट्य कलेची सुधारणा होईल. रा० बर्वे यांनीं नाटकमंडळींचें एक कॉन्फरन्स भरविण्याची सूचना केली होती; व अशी कॉन्फरन्स भरेल तर निरनिराळ्या नाटकवाल्या मंडळीं च्या अडचणी, त्यांनी कोणत्या दिशेने जावें, नाटकांत सुधारणा कशा कराव्या, प्रसंगविशेषीं सहकारी तत्त्वावर