पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

A AGSIST P अहंकार जडला जीवीं । तो साधूनि रिघोनि गोवीं । अहंकार जीवभावीं । उघड नागवी जगातें ॥ १४ ॥ मुख्य घातक अहंता । तीसी साह्य झाली ममता । अहंममता न जाणतां । सुख सर्वथा असेना ॥ १५ ॥ अहमात्मा जे मीपण । तें मुख्य भ्रमाचें निजकारण । तूं म्हणणे हा भ्रम दारुण । मीतूंपण भ्रममूळ ॥ १६ ॥ अहंता कर्मसिद्धि न वचे । अहंता सुख न घडे स्वर्गीचें । अहंता सार न पावे वेदाचें । अहंता साच घातक ॥ १७ ॥ अहंता न साधे स्वामिकार्य । अहंतेने साधन हत होय । अहंता यश न लाहे । निंद्य होय अहंता ॥ १८ ॥ अहंता नव्हे चितशुद्धि । अहंता नव्हे साधन सिद्धि । अहंता मानव्हे चित्तशुद्धि । अहंता त्रिशुद्धिघातक ॥ १९ ॥ ऐहिक सुख नव्हं देख । अथवा नव्हे पारत्रिक । अहंता भोगिजे नरक । अहंता घातक जगा झाली ॥२०॥ अभिमानाची जाती पाहीं। साधुसंता न मानी कांहीं ॥ ज्ञानगवे बुडाले तेही । शुद्ध नाही तपांची ॥ २१ ॥ धावणे नागवी आपण । तरी कोण करील सोडवण । अभिमाने यापरी जाण । सकळ जन नागविले ॥ २२ ॥ ज्ञानगवे नागविले । ते काळातें देखती वहिले । सिद्ध आयुष्य वायां गेलें । तें जोडितां न मिळे पुण्यकोटी ॥ २३ ॥ गर्वाचा ताठा चढला । तेणें विक्क बुडविला । कत्रिमदे अति मातला। घात केला स्वयेंचि ॥ २४ ॥ धनमद पानमद । अतिमान्य तेचा राजमद । तेणें प्राणी होय अंध । कार्यानुवाद नाठवे ॥ २५ ॥ नाम गिणिक o b -भावार्थरामायण. मोरोपंता- गीति. I IT RITER | PPP TIPS वह पुरुषजन्म दुर्लभ, तेथे अत्यन्त सर्व हानिकर । पापांचा, शापांचा, तापांचा होय गर्व हा निकर ॥ २६ ॥ अर्थीही मद होतो, होय पुरुष बहु अनम्र बा! धात्या । पार अवमानितो जनति, [हरितेही,] ती पिशाचबाधा त्या.॥ २७ ॥ जो ज्ञाता हितकर्ता, म्हणती · कुलजी न दर्प राहो तो; । की या सर्वरवहरा भजतां जन पात्र खर्परा होतो. ॥ २८॥