पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आ DISTS ARE APPY HERE op . nीपस्तावना जाना लग मिलामा जाने ना माना जाता १. सांप्रत प्रचलित शिक्षणपद्धतीची धार्मिक व पौराणिक ग्रंथांशी फारकत झाल्यामुळे व तीत मराठीचा मान अनेक कारणांनी जात चालल्यामुळे, आमचा विद्यार्थिवर्ग स्वतःच्याच पूर्वजांच्या काव्यकृतीला पारखा झालेला आहे. सामान्य जनांचीही स्थिति या बाबतींत शोचनीयच झाली आहे. व्यवहारांत इंग्रजीचे प्रस्थ दिवसेंदिवस माजत जाऊन, मराठीचा सासुरवास वाढत आहे ; हरिकीर्तन, पुराण, पोथीवाचन वगैरे पूर्व प्रकार हेळसांडीने मागे पडून, त्यांच्या जागी कोणत्याही नवीन संस्था उद्भवल्या नाहीत; भक्ति व श्रद्धा यांचा अंमल नष्ट होऊन, त्या ठिकाणी संशय किंवा उदासीनता यांचा पगडा मनावर बसलेला आहे. या गोष्टींनी पूर्व कवींचा परिचय मागे पडून, ओळखही विसरल्यासारखी होऊ लागली आहे. ही स्थिति सुधारण्याला एक उपाय हा दिसतो की मराठीतील प्रासादिक काव्यांच्या खस्त आवृत्त्या छापून व त्यांतील सुंदर सुंदर वेंचे काढून, ते विद्यार्थी व सामान्य वाचक यांच्या हाती पडतील असा प्रयत्न करण्यात यावा. याच दिशेनें प्रस्तुत प्रयत्न आहे. या सलमान २. काव्यग्रंथांतील वेंचे अनेक धोरणांनी काढतां येण्यासारखे असतात. सृष्टीतील देखावे, मानवी स्वभाव, युद्धादि प्रसंग, सुंदर आख्याने, हृदयंगम संवाद, प्रासादिक व प्रतिमाद्योतक रचना, शृंगारादि रसांचा उत्कर्ष, सामान्य नीति, ईशभजन, संगीतादि प्रकार, अलंकारादि साहित्याची अंगें इत्यादि एक किंवा अनेक गोष्टींवर कटाक्ष ठेवून निरनिराळ्या त-हेची निवड होण्याजोगी आहे. प्रस्तुत प्रयत्नांत मुख्यत्वें सामान्य व्यावहारिक नीति व धर्मनिष्ठा यांवर रोख ठेविलेला आहे.