पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ परोपकार. मोड मुक्तेश्वरः-- ओव्या. म्हणे पवित्र ये संसारी । धन्य धन्य परोपकारी । सकळ कीर्तिवंत शरीरी । शिरोमणी तो एक ॥ १ ॥ जिही आपल्या सर्व यत्नें । पराचे क्लेश परिहरणे । श्रमोनी पुढिल्या सुख दावणें । तो एक धन्य संसारीं ॥ २ ॥ प्रेरणा न करितां संकटीं । कृपेनें अनाथ घाली पोटीं । केला उपकार न बोले ओठीं । तो एक धन्य पुरुष ॥ ३ ॥ आपुल्यासमान पुढिला पाहे । पराच्या संतोषे संतोष लाहे । अन्यक्लेशे क्लेशत जाये । तो एक धन्य संसारीं ॥ ४॥ परोपकारा वरिलें नसतां । विधवासंतति नाशवंता । जैशी नाकाविण वनिता । श्लाघ्य न मानी सौंदयें ॥ ५॥ परोपकाराविण जो जन । तो जाण हीन पाषाण । तनुधन लोभामाविष्टविण । असे माखून सांडिला ॥ ६ ॥ परोपकाराविण समर्थ नर । तो प्रेताचा । देहशृंगार । मांडवावांचोनि वाद्यगजर । नेतां सत्वर दहनार्थ ॥ ७॥ जेणे लाप्रकारे परोपकार । घडे, तोचि गा पवित्राचार । परातें पीडाकारक थोर । तोचि मा अधर्म जाणिजे ॥ ८ ॥jabi S oamish बाजार का 0155197 ! -आदिपर्व. श्रीधरः-- आव्या. काही खळजनाचा धरणें विश्वास । तेणे होय दुजयाचा नाश । हें तो नावडे सज्जनास । तो परोपकारीच सर्वदा ॥ ९॥ पाहतां रोहिणीचा धव । राहुग्रस्त एक पार्श्व । एकाच पार्श्वे जग सर्व । पीयूकरूनि निववीत ॥ १०॥ तावितां दिव्य होय सुवर्ण । घासितां सुगंध चंदन । गाळितां सुरस इक्षु पूर्ण । तेवीं सज्जन परोपकारी ॥ ११ ॥ जोवरी आहे संपत्तिभार । तोंवरीच साधावा परोपकार । दधीचि मनीने आपुलें शरीर । देवकार्या लाविलें ॥ १२॥ ना तरी अमावास्येचे चंदें । शीतळ होती काय शरीरें । उष्णकाळींचे जलधरें । काय वृष्टि करिजेल ? ॥ १३ ॥ -अश्वमेध.