पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) AS गीत. जो प्रेरील प्रेमें गाया श्रीविष्णुच्या चरित्रास, । कि साक्षात् तो श्रीरामचि संसृतिचा वारिता परित्रास.॥ १३ ॥ सुकविमन न सोडी हरियश, जैसें तोक थान ; याग या । बहुतचि अंतर; विसरे, जो सुरसिक, तो कथा न या गाया. ॥ १४ ॥ हरिचरिताच्या पानें, गानें, भवपाश सुदृढही उकले;। मुकले सुखास, ऐसें जे न करिति; पटुहि फार ते चुकले ॥ १५ ॥ भगवान् नारद गातो हरिहरयश, वाजवूनि वीणा रे!। चित्ता ! ज्यातें नमिती सत्कृति रामायणादि वीणारे. ॥ १६ ॥ चित्ता! जेणें कामप्रमुखाहितसहित कळि वदे 'हा', ते । हरियश चिंती; लटिकें स्पष्ट स्वप्रेम, कळिव देहाते. ॥ १७ ॥ OFFEMPO-अवतारमाला. काला १४ यश, कीर्तिना हक मुक्तेश्वरः - ओपी धन होगा पुरुषं तंव जगावें जगीं । जंव अपकीर्ति न शिवे अंगीं । अपयशवंत तो कुमार्गी । जितचि मेल्यासमान ॥१॥ 15.silsT RATE FREE -वनपर्व. श्रीधर- ओव्या. जननिंदेचे संभाषण । रायासी हे परम दूषण । सद्यः करी यशहाण । कीर्तिसदन पाहोनी ॥ २ ॥ भगीरथ पुरूरवा ययाती । इक्ष्वाकु हरिश्चंद्र चक्रवर्ती । अद्यापि तयांची कीर्ति । सकळ वर्णिती निजमुखें ॥ ३॥ कीर्तिविरहित जन्म । तो परम दुर्भरणासमान । त्यासी न भेटे सर्वोत्तम । व्यर्थ वाचणे तयाचें ॥ ४ ॥ स्त्री पुत्र भ्रात प्रिय ज्यास । परी त्यांच्या योगें घडे अपेश । त्यांचा त्याग करावा निःशेष । तरीच सौख्य पावावें ॥ ५ ॥ कीर्तिनिमित्त सोडिती प्राण ।