पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कर देखतां ऋषि तयासि न पूजी, । चाटतो द्विज तयास रिपू जी ! ॥ भोंवया करुनि वक्र पहातो, । मित्र भिक्षुक अमान्य अहा ! तो. ॥ ३२ ॥ का न तो हालवी मस्तकातें कदापी, । दुरूनीच तो शुष्कशब्देंचि दापी ॥ 10 तयी बोबडी ती चळे भिक्षुकाची, । न ते गोष्टिही गोड बोले फुकाची. ॥ ३३॥ अलक्ष्मीस लक्ष्मीस तो वैरभाव । स्त्रियांचाच नैसर्गिकी तो स्वभाव ॥ म्हणूनीच शत्रुल या संततीतें, । विचारूनि पाहें [ सती! ] तूं मतीतें. ॥३४॥ सुदामचरित्र. - REP १२ श्रोतावक्ता निक श्रीधर:- HE M E FREE जिक रोहिणीरमणाचे किरण । लागतां चंद्रकांत द्रवे जाण । ना तरी परभृतांचे मौन । वसंतागमनी फिटतसे ॥ १ ॥ ना तरी दिनमणी देखोन । सूर्यकांतांतून पडे हुताशन । तेवीं श्रोता झालिया सावधान । निरसे जडल वक्त्याचें ॥ २ ॥ श्रोता झालिया दुश्चित । व्यग्र होय वक्त्याचे चित्त । निघत असतां कथामृत । कुंठित होतें अवधारा ॥ ३ ॥ गृहा पातलिया ग्राहक । तयाची पाहोनियां भूक । तैसेंचि तया अंशुक । काढोनि दावी व्यवहारी ॥४॥ जरी स्नेहदीप पूर्ण असे । तरी दुरील पदार्थ दिसे । निःस्नेहवे मंदत्व दिसे । ही तो प्रचीत सर्वांसी ॥ ५॥ ना तरी कंठामाजी निघे उत्थापनी । जितका वायु तितकाच ध्वनि । मंद वायु होतां त्यालागोनी । शब्द सहजचि मंदावला ॥ ६ ॥ मुरली वाजती गोड । परी वाजवितांचि पुरवी कोड । न वाजवितां निश्चल जड । अचेतन काष्ट तें ॥७॥ श्रोतयाचें मन दुश्चित । गोड न लागेचि कथामृत । रोगें व्यापिला जो निश्चित । मिष्टान्नतया नावडे ॥ ८॥ चिंतोर्मिरहित जरी श्रोता । आशाराक्षसीवियुक्त वक्ता। तेथींची जी भगवत्कथा । तिचे सुख काय सांगू ॥ ९ ॥ जरी पुण्य असेल गांठीं। तरी उत्तम श्रोत्याची पडेल गांठी । मग वक्त्याचे ओष्ठपुटीं । शब्दरत्ने विकासती ॥ १० ॥ श्रोता जोडलिया प्रवीण । वाग्देवी उल्हासे पूर्ण । पदोपदी प्रेमार्थ गहन । प्रसवे जाण अवधाना ॥ ११॥ श्रोता मिळतां अधम । वाग्देवी संतापे