पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रसग्रहण : येथे लेखकाला सृष्टीच्या अनेक रूपांपैकी एका विशिष्ट -रूपाचे वर्णन करावयाचे आहे. ते विशिष्ट रूप म्हणजे श्रावणति दिसणारे सृष्टीचे रूप. त्या महिन्यांत दिसणाऱ्या ठळक गोष्टींचेच वर्णन येथे आले आहे. हिरवळ, हिरवळीतच डोकावणारी फुलेही येथे नजरेत भरतात. त्यानंतर तोरणासारखे भासणारे इंद्रधनुष्य हा तर श्रावणाच्या सृष्टीतील एक महत्त्वाचा विशेष आहे. . उन्हाळ्यात दृष्टीस पडणारे भकास, रूक्ष, दारिद्र्य नाहीसे होऊन · सारी सृष्टी आता पार बदलून आल्हादमय झाली आहे. श्रावणातील हे सृष्टिसौंदर्य सर्वांच्या नित्य प्रत्ययाला येणारेच आहे. -श्रावणातील या सर्वच सृष्टिसौंदर्याचा परिणाम बालकवींनी आपल्या -श्रावण महिन्यावरील कवितेत वर्णन केला आहे. श्रावणातील हे - सृष्टीचे सौंदर्य पाहून बालकवी आनंदाने गाऊ लागतात. - 6 '..]: श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे. '