पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. लहानशा भाववृत्तीचे अंग अंग, कण नि कण उत्कटपणे अनुभवणे व अनुभवाची केवळ निखळ संवेदना वेचणे ही रेग्यांची काव्यवृत्ती. नाविन्यपूर्ण शब्दयोजना करून अर्थसंगती बरोबरच नादसंगतीही ते साधतात. ' त्रिधा - राधो' ही एकच कविता रेग्यांच्या काव्यशैलीचे विविध पैलू दाखविण्यास व त्यांच्या कविमनाची ओळख करून देण्यास पुरेशी आहे. नमुना उदाहरण : गद्य श्रावण महिन्यातले सृष्टीचे सौंदर्य पाहून ज्यांचे मन प्रसन्न होत नाही असा कोणी मनुष्य सापडणे शक्य नाही तसे पाहिले तर सृष्टीचे कोणतेही रूप सुंदरच असते. सृष्टीच्या प्रत्येक दर्शनात काही तरी आकर्षक, रमणीय असे असतेच, परंतु ते पाहण्याची रसिकता मात्र पाहिजे. श्रावणातले सृष्टिसौंदर्य इतके स्पष्ट असते की, ते कोणाच्या नजरेतून सुटणे शक्य नाही. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. त्यामुळे एरव्ही रुक्ष दिसणारे प्रदेशही सुंदर दिसू लागतात. त्या हिरवळीकडे पाहिले की, सृष्टि- सुंदरी हिरवागार शालू नेसली आहे असे वाटू लागते. हिरवळीत मधून मधून डोकावणारी फुले ही जणू काय तिच्या शालूवर काढलेली नक्षीच आहे असे वाटते. आभाळात इंद्रधनुष्याची कमान पाहून जणु काय नभोमंडपावर हे कोणी तोरणच बांधले आहे असे वाटते. [ ६८