पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टेबल, टेप, रेडिओ, कुमक, करामत, माहिती इ. जे शब्द अन्य कोणत्याही भाषेतून आलेले आहेत असे व्युत्पत्तीवरून म्हणता येणार नाही व खास मराठीतच ते तयार झालेले आहेत अशा शब्दांना 'देशी शब्द म्हणतात. उदा : आकाश, निवारा इ. मूळ शब्दांच्या किंवा धातूंच्या मागे एक वा अधिक अक्षरे शब्द बनतात त्यांना ' उपसर्गघटित शब्द' म्हणतात. लावून जे उदा : अ, ना, बिन, व, आ, उ, तु, अधि, दूर, प्र, प्रति, उप, नि, भर, बे, हे उपसर्ग आहेत व यावरून अनेक शब्द उत्कर्ष, अवकृपा, प्रगती, उन्नती यासारखे तयार झालेले आहेत. उपवास, आजन्म, आमरण, प्रदोष, परिस्थिती, सन्मुख, निरभ्र, बेजबाबदार, नापसंत, अनोळखी, दुर्जन, अवलक्षण ही त्याची काही आणखी उदाहरणे आहेत. काही शब्दांच्या किंवा धातूंच्या पुढे एक वा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात त्यांना ' प्रत्ययघटित शब्द ' असे म्हणतात. इक, क, ना, ईय, ता, रा, कट, इत, दार, बाज, पणा, री, य असे प्रत्यय लावून तयार झालेले काही प्रत्ययघटित शब्द - दैनिक, रसिक, शेतकी, माणुसकी, मानवता, शिलेदारी, कौटिल्य, घटित, इच्छित, नातेवाईक, दुकानदार, गोडपणा,. स्वकीय, दारुबाज, दवाखाना, शौर्य, धैर्य इत्यादी सांगता येतील. काही वेळा शब्द वा त्याच शब्दांतील काही अक्षरे पुन्हा-पुन्हा येतात अशा शब्दांना ' अभ्यस्त शब्द' म्हणतात. उदा : मारामार, हळूहळू, चिल्लीपिल्ली, सरसर, टकटक काळाकाळा असे हे शब्दसिद्धी प्रकरण शुद्धलेखनासाठी अवगत असावे. १७