पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२) अनुस्वारयुक्त इकार व उकार सामान्यतः हस्व लिहावेत. उदा : चिंच, नारिंग, कुंचा, गुंड, सुरुंग, सुंठ, उंट, तुरुंग, कुंड, गुंग, बाशिंग. २३) काही अनेकाक्षरी शब्दांतील 'इ' कार व 'उ' कार : उदा : शिकेकाई, दालचिनी, पुष्करिणी, कोशिंबीर, इंद्रायणी, राजधानी, सरोजिनी, सौदामिनी, भद्रकाली, कवयित्री. २४) नामसाधित ( तद्धित ) अल्पत्वदर्शक शब्दांचे लेखन : उदा : डोंगरी, विळी, वाडी, पळी, वाटी, टोपली, तबकडी, चांदुकली, धनुकली, पाखरू, शिंगरू, मेंढरू, वासरू, २५) अन्य भाषेतील शब्द त्या लकबीनुसार -हस्व-दीर्घ लिहावेत. उदा : फकिरी, गाफिल, हकीम, दिक्कत इ. शब्दसिद्धी प्रकरण संस्कृतमधून जसेच्या तसे, अविकृत, कोणताही बदल न होता आलेल्या शब्दांना 'तत्सम शब्द म्हणतात. उदा : हस्ती, संस्कार, मंत्र, सत्य, बंधू, माता, पिता, पुण्य, स्वर्ग, पवित्र, श्रोता, पूजा, कन्या, संकल्प, इत्यादी शब्द तत्सम आहेत. संस्कृत भाषेमधून बदल होऊन आलेल्या शब्दांना तभ्दव शब्द' म्हणतात. उदा : भाऊ, घर, पंख, चाक, दूध, कान, पान, ओठ, आग, चोच पाच हे शब्द अनुक्रमे भ्रातृ, गृह, पक्ष, चक्र, दुग्ध, कर्ण, पर्ण, चक्र, ओष्ट, अग्नि, चंचू, पंच या संस्कृत शब्दापासून उद्भवलेले आहेत. जे शब्द इतर भाषेतून आलेले असतात त्यांना 'विदेशी शब्द' म्हणतात. उदा : छावणी, बटाटा, १६