पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११) संधी नियमानुसार दीर्घ इकार व उकार लिहावेत. उदा : कवीश्वर, गुरूपदेश, कवीच्छा, भानूदय, रवींद्र, यतीश, परीक्षा, प्रतीक्षा .. १२) व्यंजनांमध्ये दीर्घ इकार वा उकार समाविष्ट झालेले शब्द दीर्घ लिहावेत. उदा : जगदीश, वागीश्वरी, समीक्षा, निरीक्षण. १३) 'द्धि' समासातील ई दीर्घ लिहावा. उदा : शुद्धीकरण, अंगीकार, स्वीकार, वर्गीकरण, सैनिकी- करण, एकीकरण, समीकरण, एकत्रीकरण. १४) दोन अक्षरी शब्द अन्त्य जोडाक्षर असल्यास उपान्त्य इकार व उकार हस्व असतात. उदा : किल्ला, कित्ता, कुत्रा. १५) संस्कृतमधून आलेले व मराठीत दीर्घच राहतात. उदा : सूत्रात, आत्मसात न झालेले शब्द गीतेत इ. १६) दोन अक्षरी शब्द अन्त्य स्वर -हस्व अकारान्त असतांना उपान्त्य इकार व उकार सामान्यतः दीर्घ असतात, उदा : खीर, रीत, फूल, धूर, चीर, बीज, तीळ, शीव, १७) अनेकवचनी, विभक्तीचे प्रत्यय वा शब्दयोगी अव्यय जोडून आले असतांना हेच इकार व उकार -हस्व होतात. उदा : विटा, चुली, मुले, शिरा, खिरीत, फुलांचा, तुपाने, पिठावर, चुलीपुढे इत्यादी. E १४: