पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उप- उपक्रम, उपग्रह, उपकार. दुस्- दुर्- दुर्गुण, दुराचार, दु:स्थिती. निस्- निर्- निर्गुण, निराकार, निष्कारण, निर्बंध, २) संस्कृतमधील कर्म. भू. धा. विशेषणातील 'इत' प्रत्यययुक्त शब्द, -हस्व उपान्त्य इकारासह लिहावेत. उदा. : पुष्पित, परिमित, फलित, वंदित, आकर्षित, आनंदित, विभूषित, विकसित, समर्पित, प्रज्वलित, विचलित इ. या प्रकारच्या विशेषणांतील इकार व उकार मराठीत -हस्व वा दीर्घ मूळ विशेषणाप्रमाणे लिहावेत. उदा. : जि-जित = पराजित, कष्टार्जित = अनुभूत स्था-स्थित = उपस्थित, प्रतिष्ठित भू - भूत ३) विध्यर्थी विशेषणांतील 'ई' कार दीर्घ लिहावेत. 2 अनीय प्रत्यययुक्त शब्दांतील उदा : वंदनीय, मननीय, वाचनीय, रक्षणीय, प्रेक्षणीय, रमणीय, पूजनीय, प्रशंसनीय, माननीय इत्यादी. ४) 'इक' प्रत्यययुक्त शब्दांतील इकार -हस्व लिहावा. उदा : धार्मिक, शैक्षणिक, भौगोलिक, आर्थिक, ऐतिहासिक, औद्योगिक, सामाजिक, वैचारिक, त्रैमासिक, बौद्धिक, पारंपारिक, मौखिक, वैदिक, धनिक, पडिक, रसिक, पथिक, वैमानिक, नागरिक, साहजिक इत्यादी. ५ ) ईय व ईन प्रत्यययुक्त शब्द दीर्घ ईकारयुक्त लिहावेत. उदा : शास्त्रीय, भारतीय राष्ट्रीय, एतद्देशीय इ. कालीन, ग्रामीण, विद्यालयीन, कार्यालयीन इ. घ १२