पान:मयाची माया.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. शिवायला दिले आहेत; आणखी ते त्यानें आठ दहा दिवसानंतर आणून देण्याचें भगवानदास शेटजीपाशीं कबूल केले आहे. " कायरे तुझे शेटजी, आणखी तुझे पाहुणे चांगले श्रीमंत आहेत नाहीं ? " " होय ते दोघेही मोठे व्यापारी आहेत. ' ' बरें तें असो ह्मणा. पण आणखी दोन तीन दिवसांनी आझी तुझ्या शेटजीकडे कांहीं कामासाठी येणार आहों. तेव्हां तुझे ते पाहुणे घरीं असतील की नाहीं ? ', " ते मला कांही सांगता येणार नाहीं. मुंबईत ते अगदी पहिल्यानेंच आले आहेत; तेव्हां ते रोज सारा दिवस व रात्र बहुतकरून कोठेतरी हिंडत असतात, पण त्यांची भेट ........" दोघांचें इतकें बोलणें होत आहे तो त्या बाजूने एक पोलीसकॉन्स्टेबल जातांना दृष्टीस पडला. त्याला पाहतांच गाडींतल्या एका इसमानें पिरो- जला कांहींतरी खूण केली; व लागलीच पिरोज गाडींत जाऊन बसला; आणि विरुद्ध दिशेनें त्यांची गाडी जोरानें निघाली ती पाहता पाहतां दिसेनाशी झाली ! या गोष्टींचा कार्यकारणसंबंध कांहीं केल्या माझ्या ध्यानांत येईना. निर निराळ्या जातीची तीन माणसें बरोबर घेऊन पिरोजचें आमच्या शेटजींच्या घरीं येणें, गड्याला विचारून त्यानें कांही गोष्टींचा व विशेषेकरून माझ्या- संबंधाचा खुलासा करणे, तितक्यांत तेथें पोलिसकान्स्टेबल येणें व लागलीच त्या मंडळींचें विरुद्ध दिशेकडे मोठ्या गर्दीनें निघून जाणें; वगैरे गोष्टींची संगती मला लावितां येईना. तरी पण ही हकीकत दृष्टीस पडल्यापासून माझ्या मनानें एक नवीनच भीति घेतली ! काय ? शिरीनच्या प्रेमासाठी आपण करीत असलेला प्रयत्न शेवटी निष्फळ ठरून आपल्याला त्याबद्दल कांहों तरी भुर्दंड भोगावा लागणार ? त्या पिरोजला कायमचें टाळण्याची कांही तरी युक्ती आपल्याला शोधून काढितां येईल काय ? बरें शिरीन आपल्याबरोबर दुसऱ्या एखाद्या गांवीं रहावयाला येण्यास तयार होईल काय ? तिच्या ह्मणण्याप्रमाणे वागून नंतर आपले खरे स्वरूप तिला व्यक्त करून दाखविले तर त्याचा परिणाम आपल्याला अनिष्ट होईल की काय ? या नव्या संकटाला आत काय उपाय करावा ? ७