पान:मनू बाबा.djvu/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झिजला होता. पंधरा वर्षे त्या घड्याने निर्मळ जीवन दिले. तो घडा मनूच्या जीवनाचा जणू एक भाग झाला होता. तो घडा निर्जीव नव्हता. तो घडा मनूशी बोले, मनूशी हसे. परंतु तो घडा आज गेला. एक महान मित्र गेला. मनूने आदराने ते तीन तुकडे उचलून घरी आणले. ते तीन तुकडे त्याने कसे तरी सांघवून तेथे ठेवले. ते जणू त्या घड्याचे स्मारक होते. ती जणू आठवण होती. फुटलेल्या घड्याला मनूच्या प्रेमाने जणू पुनर्जन्म दिला. परंतु तो घडा आता पाण्याच्या उपयोगी नव्हता.

 मनूच्य झोपडीतील साऱ्या वस्तू जणू सजीव होत्या. तो मग गाणे गाई. ते फुटके मडके बोले. ती सोन्याची नाणी म्हणजे तर परमानंद. त्या खोलीतील वस्तू म्हणजे त्याचे मित्र. तेच त्याचे कुटुंब. तीच त्याची मुलेबाळे. अशा रीतीने मनूचे आयुष्य चलले होते. तो आता म्हातरा दिसू लागला. त्याचे वय फार तर चाळीस असेल. परंतु सारे त्याला "बुढ्ढेबाबा" म्हणून म्हणतात.

१२ * मनूबाबा