पान:मनू बाबा.djvu/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


सत्य लपत नाही

"बाबा, बागेसाठी घेणार ना जागा? कधी घेणार?" सोनीने विचारले.

"घेणार आहे. हल्ली त्याच खटपटीत आहे." मनूबाबा म्हणाले. आणि मनूबाबा खरोखरच त्या उद्योगात होते. झोपडीच्या जवळच ते जागा बघत होते. ज्या ठिकाणी सोनीची अनाथ माता मरून पडली होती, ते ठिकाण बागेच्या मध्यभागी असावे अशी एक सुंदर उदत्त कल्पना त्या विणकराच्या मनात आली.ती साडेतीन हात जागा बागेच्या मध्यभागी पवित्र राखू. भोवती फुलांचे ताटवे लावू. जणू सोनीच्या आईची समाधीच! असे विचार मनूबाबाच्या मनात खेळत होते.

मनूबाबाने ती जमीन खरेदी केली. पडीतच जमीन होती. फार किंमत पडली नाही आणि संपतरायाने ती जमीन कमी किंमतीत त्या म्हाताऱ्याला मिळावी म्हणून योजना केली. संपतरायाचे सोनीवर प्रेम होते. मधूनमधून तो मनूबाबाकडे पैशाच्या रूपाने मदत पाठवीत असे.

मनूबाबांनी जी जमीन खरेदी घेतली, तिच्याभोवती दगडांचे सुंदर कुसू घालून देण्याचे संपतरायाने ठरविले. त्या जमिनीजवळच दगडांची खाण होती. तो जो खळगा होता, तेथेच ती खाण होती. मजूर तेथे कामाला लागले. दगड खणून काढू लागले. तसेच तेथे जी दलदल होती, तीही भरून काढण्याचे काम सुरू झाले. मनूबाबाच्या बागेजवळ घाण नको. गावाचे गटार नको.

संपतरायाची माणसे काम करीत होती. परंतु तेथे काम करणारे एकदम चकित झाले. खणता खणता तेथे एकदम काही तरी सापडले.

४८*मनूबाबा