पान:मनू बाबा.djvu/43

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


रामू चांगला आहे. आणि बाबा, तुम्हांला काही सोडून नाही मी जाणार. आपण सारी एकत्र राहू. रामू व मी काम करू. तुम्ही विश्रांती घ्यायची. तुमचा आशीर्वाद आम्हांला मिळायचा. खरंना बाबा? तुम्हांला सोडून मी कशी जाईन? आपण एकत्र राहू."

"राहू. एकत्र राहू."

सोनीने मनूबाबांचा हात धरला. दोघं घरी आली. आज त्या दोघांचे हृदय भरून आले होते.