पान:मनू बाबा.djvu/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


संपतरायाचे लग्न

"संपत, लग्नाला तयार आहेस ना? होय म्हण. मी माझी इच्छा तुझ्यावर लादीत आहे असं नाही. परंतु इंदुमतीसारखी मुलगी मिळणं कठीण. सारं तिला येतं. ती चांगला स्वयंपाक करते, चांगली चित्रं काढते. तिला शिवणं, टिपणं, कशिदा काढणं, सारं येतं. वाचते किती छान व कविताही म्हणे करते. एवढी श्रीमंताची मुलगी, परंतु आळस तिला महीत नाही. तिला गर्व नाही. कोणाला टाकून बोलत नाही. दिसायला सुंदर, तशी मनानं सुंदर. संपत, त्या मुलीचा तू अंत पाहू नकोस. अधिक ताणल्यानं तुटतं. झाडाला वेळीच पाणी मिळालं तर ते नीट जगतं, वाढतं, फुलाफळांनी संपन्न होतं. परंतु झाडाची मुळे सुकून गेल्यावर कितीही पाणी घातलं तरी काय उपयोग? इंदुमतीचा बाप आशेनं इतकी वर्ष थांबला. शेवटी त्राग्यानं दुसरीकडे कुठं मुलीला देऊन टाकील. मुलीला पुढं जन्माचं दुःख, -- कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे. मग सांग काय ते, झाला का निश्चय?" पित्याने विचारले.

"बाबा, लग्नाला मी तयार आहे. तुमच्या इच्छेविरूद्ध मी नाही. इतके दिवस तुमच्या मनाला त्रास झाला. त्याबद्दल क्षमा करा. परंतु काही कारणामुळं मी थांबलो होतो. इंदुमतीच्या प्रेमाचीही परीक्षा होत होती. आता तुम्ही ठरवाल तो मुहूर्त. तुम्ही हाक मारलीत की मी उभा राहीन." संपत म्हणाला.

संपतराय व इंदुमती यांचा विवाह ठरला. मोठ्यांकडचे लग्न म्हणजे जणू साऱ्या गावाचे. सारे लोक खपत होते. मोठे मंडप घालण्यात

३२*मनूबाबा