आले, या गावात रांगत आले, त्या वेळेस तुम्ही मला का नेले नाही? तुम्ही नेत होतेत, परंतु एक अनाथ मुलगी म्हणून नेत होतेत .‘ ही माझी मुलगी आहे,आणि ही मरून पडलेली माझी पत्नी आहे’ असं त्या वेळेस जगाला का सांगितलंत नाही ? ही माझी मुलगी आहे असं म्हणतेत तर' मनूबाबांनी हट्ट धरला नसता. परंतु तसं म्हणण्याचं तुम्हांला धैर्यं झालं नाही. ज्या मुलीला जन्म दिला, ती माझी मुलगी असं जगाला सांगण्याची तुम्हाला लाज वाटली. का वाटली लाज ? माझ्या आईला पत्नी म्हणून इथं का आणलंत नाही ? त्या तुमच्या मोठ्या वाड्यात का आणलं नाहीत तिला ? तिला आणतेत तर मी तुमच्या मांडीवर खेळल्ये असते. आणखीही सुंदर भावंडं मला मिळाली असती. तुमचं घर गोकुळासारखं भरलेले दिसलं असतं. तुम्ही माझ्या आईला फसवलंत. तिचं रूप पाहून भुललेत. परंतु 'ही माझी पत्नी’ म्हणून जगाला सांगायला लाजलेत. तुम्ही खानदानी घराण्यातील. माझी आई गरिबाची. मोलमजुरी करणाऱ्या कुळातील म्हणून तुम्हाला लाज वाटली. प्रेमापेक्षा कुळाची व धनाची खोटी प्रतिष्ठा तुम्हांला अधिक मोलाची वाटली. काय करायची ती श्रीमंती ? चुलीत घाला ती श्रीमंती. जी श्रीमंती माणुसकी ओळखीत नाही, प्रेमाला ओळखीत नाही, ती श्रीमंती पै किंमतीची आहे. त्या श्रीमंतीची मी कशाला वाटेकरीण होऊ ? मीही मग पैशाला मोठं मानायला शिकेन व माणुसकी पायाखाली तुडवीन. मी मग रामूबरोबर लग्न करायला होईन का तयार ? "
रामूबरोबर लग्न ? त्या सखारामाच्या मुलाशी ? "" संपतरायाने आश्वर्याने विचारले.
“ हो रामूबरोबर. तो गरीब जांहे. त्याचा बाप गरीब आहे परंतु त्यांची मनं फार श्रीमंत आहेत. त्या रामूबरोबर मी लग्न लावणार आहे. तुम्ही द्याल का त्या गोष्टीला संमती ? तुम्हांला मोठं घराणं हवं. मोठं तेवढं खोटं. मी काय नुसती मोठी घरं पाहू ? मोठे खांब व तुळया पाहू ? की अंगाखांद्यावरचे दागिने कुरवाळीत बसू ? मनूबाबा नसत का पूर्वी मोहरा मोजीत बसत, मोहरा पोटाशी धरून नाचत परंतु त्यात होतं का त्यांना समाधान? समाधान माणुसकीत आहे. निर्मळ प्रेमात आहे. खोटे