पान:मनतरंग.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वातावरण यांचा मेळ बसेना. बुरखा पद्धत घरात कडक होती. माहेरी ती नव्हती. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत अमेरिकेत गेल्याने, ती पद्धत विवाहानंतर सासरच्या मुक्कामात फारशी जाचक वाटली नाही. पण ती आता जाचू लागली. सासरच्या वडीलधाऱ्या माणसांना वाटे, गावातच माहेर आहे. लेकरू झालं की माहेरी पाठवू. तोवर बहूने सासरी राहावे. अखेरीस अम्मीअब्बांना सांगून ती माहेरी गेली. योग्य वेळी मुलगा झाला. पण सासरकडून मुलगा पाहायलाही कोणी आले नाही आणि बाळ जेमतेम महिन्याचे असताना सकिनाची चुलतसासू काहीही कल्पना न देता आली आणि पाळण्यातले बाळ घेऊन निघून गेली. पाळण्यातले बाळ दिसेना आणि शोधाशोध सुरू झाली तेव्हा बाजूच्या लोकांनी सांगितले की बाळाची दादी बाळाला घेऊन गेली. तात्काळ सकिनाला घेऊन अम्मी अब्बा तिच्या सासरी गेले. त्यांना कोणीही बोलेना की, बसा म्हणेना. स्पेशल जीप करून बाळ मालेगावला घेऊन गेल्याचे कळले नि सकिनाचा धीर खचला. ती सल्ला घेण्यासाठी आमच्याकडे आली. आम्ही गावातील सुजाण, प्रतिष्ठित, ज्यांचा तिच्या सासरच्या मंडळींशी संपर्क आहे असे पाच-सहा जण घरी जाऊन भेटलो. त्यांच्या समाजातील सुशिक्षित अशा प्रौढ महिलेस घेऊन बाळाला आणण्यासाठी सकिना, तिचे आई-वडील, समाजातील प्रतिष्ठित दोघेजण जीप करून मालेगावला गेले. बाळाला घेऊन परत आले.
 अमेरिकेतून बाळाच्या वडिलांना पाठविलेल्या पत्राचे उत्तर आले नव्हते. पुढे काय करायचे ? भारतातच नोकरी पाह्यची की परत अमेरिकेत जायचे याबाबत निर्णय घेता येत नव्हता. तिच्या सासरची माणसे मुलाने... नवाजने सकिनाला तलाक द्यावा अशा प्रयत्नात होते. नवाझ सकिनाला पत्र पाठवीत नव्हता. शेवटी सकिनाच्या माहेरची मंडळी व आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय मुस्लिम कुटुंबाशी संपर्क साधला. सकिनाच्या मनात नवाज़ला भेटण्याची, अमेरिकेतील मनमोकळे जीवन जगण्याची उत्सुकता होती पण तरीही नवाज़ने स्वीकारले नाही तर पुढे काय ? पुढे काय ? हा प्रश्नही असुरक्षितता दाखविणारा होता आणि तो प्रश्नच तिला हैराण करी. सकिना अमेरिकेत गेली. दोन वर्षे अमेरिकेत राहत असल्याने व्हिसाचा प्रश्न आला नाही. सकिनाची पाठवणी काहीशी तिच्या मनाविरुद्ध केली गेली.
 अमेरिका, कॅनडा, जर्मनी आदी युरोपीय देशात 'एक देश : एक कायदा'

मनतरंग / १३४